26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeChiplunजमिनीचे भाडे न देता, त्या जमिनी थेट खरेदी करण्याची जमीन मालकांची मागणी

जमिनीचे भाडे न देता, त्या जमिनी थेट खरेदी करण्याची जमीन मालकांची मागणी

एक तर कोकण रेल्वेने या संपादित जमिनी विकत घ्यावा किंवा जमिनीचा मोबदला तत्काळ द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.

कोकणात येण्यासाठी रेल्वेचा अतिशय उत्तम पर्याय आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा हा प्रकल्प सुरु करताना अनेकांच्या जागा जमिनी यामध्ये गेल्या आहेत. त्या बदल्यात त्यांना मोबदला किंवा कुटुंबातील एकाला कोकण रेल्वेमध्ये नोकरी देण्यात आली होती. त्यामुळे बऱ्याचशा कोकणातील तरुणांना कोकण रेल्वे मध्ये विविध पदांवर नोकरी लागली आहे. परंतु आता कोकण रेल्वेचे विस्तारीकरण करताना, डबल ट्रॅकच्या मार्गासाठी देखील कोकण रेल्वेने जागा संपादन केली आहे. मात्र अद्याप त्यांचा जमीन मालकांना मोबदला देण्यात आला नसल्याने त्यांची नाराजगी दिसून येऊ लागली आहे.

कोकण रेल्वे महामंडळाने रेल्वेच्या डबल ट्रॅकसाठी येथील शेतकर्‍यांच्या कष्टकर्‍यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत, याला २० वर्षे झाली. वर्षाकाठी गुंठ्यामागे ८० ते १२० रुपये दराने कोकण रेल्वे भाडे देत आहे. संपादित केलेल्या जमिनीचे भाडे न देता त्या जमिनी थेट खरेदी कराव्यात, अशी मागणी जमीन मालकांनी रेल्वे प्रशासनाकडे केलेली आहे. तरी एक तर कोकण रेल्वेने या संपादित जमिनी विकत घ्यावा किंवा जमिनीचा मोबदला तत्काळ द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.

कामथे हरेकरवाडी येथील २० वर्षापूर्वी ७० ते ८० लोकांच्या जमिनी रेल्वे प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. आता या सर्व जमिनी रेल्वे प्रशासनाने खरेदी खताने ताब्यात घ्याव्यात व हल्लीच्या बाजारभावाने आम्हाला त्याचा मोबदला द्यावा, अशी संबंधित शेतकर्‍यांची मागणी आहे. त्यामुळे आता भाडे हा विषयच न राहता, कोकण रेल्वेने ती जागा आताच्या दाराला विकत घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular