१९९० सालामध्ये कोकण रेल्वेची स्थापना रोहा ते ठोकूर दरम्यान करण्यात आली. १ मे १९९८ ला कोकण रेल्वे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पूर्ण झालेल्या रुळावरील पहिली ट्रेन २६ जानेवारी १९९८ ला सुरु झाली. देशाच्या पश्चिम किनाऱ्या लगतच्या कोकण विभागातील लोकांसाठी कोकण रेल्वे हे एक प्रकारे स्वप्न साकार झाल्यासारखे आहे. हे या प्रदेशातील लोकांना देशाची व्यावसायिक राजधानी असलेल्या मुंबईशी जोडते.
दऱ्या खोऱ्यां कडे कपारीमधून मार्ग काढत कोकण रेल्वे धावत आहे. ७४० किलोमीटर मार्गावरील ९१ बोगद्यांसह ३५० कटिंग्जच्या ठिकाणाहून विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. बिकट परिस्थिती मध्येही मार्ग काढत, पाच टप्प्यात हे काम सात वर्षात झाले, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरेच्या मार्गावर अनेक मोठे पूल, खोल कटिंग्ज आणि लांब बोगदे आहेत. मार्गावर ९१ बोगदे आहेत आणि बोगद्याच्या विभागातील मार्गाची एकूण लांबी ८४.४९६ कि.मी. एकूण मार्गाच्या लांबीच्या सुमारे ११ टक्के आहे. सात मोठ्या लांबीच्या बोगद्यांमध्ये सक्तीची वायूविजन यंत्रणा देण्यात आली आहे. सर्व लोको पायलटना इलेक्ट्रिक ट्रॅक्शन लोको चालवण्यासाठी टप्प्या टप्प्याने प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे उच्च परिचालन कार्यक्षमता आणि वाहतुकीची कमी युनिट खर्च होईल. त्यामुळे देशाला तसेच कॉर्पोरेशनला फायदा होईल.
विद्युतीकरणाचे असंख्य फायदे लक्षात घेणे फायदेशीर आहे. म्हणजे इंधन खर्चात लक्षणीय बचत म्हणजे १५० कोटी पेक्षा जास्त. या मार्गाच्या विद्युतीकरणामुळे विभागाचा सरासरी वेग सुधारेल आणि लाइन क्षमता वाढण्यास मदत होईल.
रेल्वे विद्युतीकरणाचे काम पार पाडणे, हे एक मोठे आव्हान होते. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा अचानक पूर आणि भूस्खलन किंवा माती घसरल्यामुळे खोल आणि लांब कटिंगच्या कामावर विपरित परिणाम होतो. परंतू, या परिस्थितीमध्येही कोकण रेल्वेचे विद्युतीकरण ५ टप्प्यात पूर्ण झाले.