29.8 C
Ratnagiri
Thursday, May 16, 2024

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोविंदाने स्टेजवर केला डान्स

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गोविंदा पुन्हा राजकारणात...

मतदान प्रक्रियेसाठी एसटी बसेस आरक्षित झाल्याने प्रवाशांचे नियोजन फिस्कटले…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील येथील एसटी आगाराच्या...

उपासमारीची वेळ पाणलोट सचिवांचा आंदोलन छेडण्याचा इशारा…

प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास योजनेअंतर्गत गेल्या...
HomeDapoliपरबांची ईडी चौकशी सुरु, शिवसेनेला दुहेरी धक्का बसण्याची शक्यता

परबांची ईडी चौकशी सुरु, शिवसेनेला दुहेरी धक्का बसण्याची शक्यता

परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दापोली रिसॉर्ट प्रकरणात ईडीने अनिल परब यांना समन्स बजावले होते. त्या प्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची गेल्या नऊ तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. दरम्यान, परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अनिल परब हे शिवसेनेचे तगडे नेते तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे जर परब यांना अटक झाली तर, शिवसेनेला दुहेरी धक्का बसू शकतो. त्यानंतर आज सकाळपासून ईडी कार्यालयात परब यांची चौकशी सुरू असून, परब यांच्या समर्थनार्थ ईडी ऑफिसबाहेर शिवसेनेचे कार्यकर्तेही जमण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान काही दिवासांपूर्वी अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली होती. परन्तु ते चौकशीला हजर न राहता, शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. त्यामुळे आपण चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाऊ शकलो नव्हतो असे परब यांनी सांगितले होते. भाजपचे किरीट सोमय्या यांनी परब यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप करत काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आता परब प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांनी २०१७ मध्ये दापोली येथे एक प्लॉट खरेदी केला होता. प्लॉटच्या नोंदणीनंतर परब यांनी २०२० मध्ये मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम यांना ही जमीन १.१० कोटी रुपयांना विकली. यामध्ये अनेक प्रकारची फसवणूक झाल्याचा आरोप परब यांच्यावर करण्यात आला आहे. या दरम्यान या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्यात आले. त्याच्या बांधकामासाठी ६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत, भाजप नेते किरीट सोमय्यांनी काही पुरावे ईडी कार्यालयात सादर केले होते. तसेच अनिल परब यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, असे देखील सूचकपणे म्हटले होते.

RELATED ARTICLES

Most Popular