कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल झाले आहेत. काही जणांचे गणपती हे दीड ते १२ दिवसापर्यंत असतात. रेल्वे प्रशासनाने येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांसाठी सूचना जारी केली असून, दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन करून अनेकांचा उदया पासून परतीचा प्रवास सुरु होईल. ज्या प्रवाशांचे आरक्षण आहे अशाच प्रवाशांनी स्थानकामध्ये यावे. ज्या प्रवाशांचे आरक्षण नसेल अशा प्रवाशांना कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानकात प्रवेश स्वीकारला जाणार नाही असा कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.
मुंबईतून कोकणात येणाऱ्या प्रवाशाकरिता कोकण रेल्वेने या वर्षी मोठे नियोजन केले आहे. २०० पेक्षा अधिक फेऱ्या कोकण रेल्वेनी गणेश भक्त कोकणात दाखल होत आहेत. गणेश भक्ताच्या परतीच्या प्रवासाचे हि कोकण रेल्वेने उत्तम नियोजन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानकावर गर्दी उसळू नये या करिता कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकामध्ये बॅरेकेटस लावण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून येथे येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात असून नोंद ठेवली जात आहे. त्याचप्रमाणे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांची मदत घेतली जात आहे.
त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दीड दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांच्या सुरु होणार्या परतीच्या प्रवासासाठी आधीच सूचना जरी केली असून, केवळ आरक्षण असलेल्या प्रवाश्यांना स्थानकामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ज्याच्याकडे आरक्षण असेल अशा मंडळींनी कृपा करून स्थानकावर गर्दी करू नये, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना स्थानकामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे, आरक्षण असलेल्या मंडळीनी देखील तपासणी करीता आपल्या ट्रेनच्या नियोजित वेळेपूर्वीच उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.