29.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

रत्नागिरीतील मिरकरवाड्यात निघृण हत्त्या

शहरातील मिरकरवाडा खडप मोहल्ला येथे एका तरूणाचा...

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...
HomeKokanआजपासून कोकण रेल्वेचे नियमित वेळापत्रक लागू

आजपासून कोकण रेल्वेचे नियमित वेळापत्रक लागू

दरडी कोसळण्याची भीती असल्याने, कोकण रेल्वेवर प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वेगाडीच्या वेगावर मर्यादा आणली जाते.

आज, मंगळवारपासून कोकण रेल्वेवर नियमित वेळापत्रक लागू होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील गाड्या आता पूर्ववत १०० ते ११० किमी प्रतितास या वेगाने धावणार आहेत, असे मध्य आणि कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.

पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याची भीती असल्याने, कोकण रेल्वेवर प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वेगाडीच्या वेगावर मर्यादा आणली जाते. आणि त्यानुसार मान्सून वेळापत्रकात बदल करण्यात येतो. या वेळापत्रकाप्रमाणे कोकण रेल्वेवरील विविध विभागांत ५० ते ८० किमी प्रतितास अशी वेगमर्यादा असते. त्यामुळे मेल-एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वेगाड्या विलंबाने धावतात.

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोकण रेल्वेवर आज, १ नोव्हेंबरपासून नियमित वेळापत्रक लागू होणार असल्याने गाड्यांचा वेग वाढणार आहे. यामुळे प्रवाशांच्या प्रवास वेळेत मोठी बचत होईल. त्यामध्ये आनंदाची बातमी अशी कि, कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने डिझेलवर धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या आता विजेवर धावू लागल्या आहेत. यामुळे कोकण रेल्वेच्या खर्चात मोठी कपात झाली आहे.

डिझेल इंजिनमुळे होणारे वायू प्रदूषणदेखील आटोक्यात आल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे दिवा-रत्नागिरी-दिवा, दिवा-सावंतवाडी रोड-दिवा,  , जनशताब्दी, तेजस, मांडवी, हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम राजधानी एक्स्प्रेससह कोकणकन्या, तुतारी, मत्स्यगंधा, दुरांतो, एलटीटी-करमाळी, गरीब रथ आणि नेत्रावतीसह अन्य मेल-एक्स्प्रेसच्या प्रवास वेळेत बचत होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. त्यामुळे प्रवाशांनी नवीन वेळेचा होणारा फायदा लक्षात घेऊन प्रवास करावा.

RELATED ARTICLES

Most Popular