27.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeKokanगाड्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे, चाकरमान्यांना प्रचंड त्रास

गाड्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे, चाकरमान्यांना प्रचंड त्रास

रेल्वेने तात्काळ लक्ष देऊन प्रवासासाठी अतिरिक्त गाड्यांची सोय करावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघाकडून करण्यात आली आहे.

गणेशोत्सव हा कोकणी लोकांच्या जिव्हाळ्याचा सण असून दरवर्षी गणेशभक्त आवर्जुन आपापल्या गावी जात असतात. परंतु, मागील दोन वर्षामुळे कोविडच्या महामारीमूळे चाकरमान्यांना कोकणात जाता आले नव्हते. तब्बल दोन वर्षांच्या कोरोना सावटानंतर कोकणासह संपूर्ण राज्यात निर्बधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे यंदा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून २५० पेक्षा जास्त विशेष गाड्या तर, एसटी महामंडळाने ३ हजार ५०० पेक्षा जास्त एसटी बसेस सोडण्यात आल्या आहे. इतकेच नव्हे तर,गणेशोत्सव साजरा करण्यातकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होऊन नयेत, म्हणून भाजपकडून निःशुल्क मोदीं एक्सप्रेस चालविण्यात आली; मात्र आज पण कोकणकन्या, तुतारी एक्सप्रेस सारख्या रेल्वे गाड्यातून भरगच्च गर्दीतून चाकरमान्यांना हाल अपेष्टा सहन करत प्रवास करावा लागत आहे.

रेल्वेने चुकीचे नियोजन केल्यामुळे सर्वसामान्य कोकणवासीयांना मोठा फटका बसत असल्याचा आरोप कोकण रेल्वे प्रवासी संघटने कडून करण्यात आलेला आहे. गणेशोत्सवासाठी कोकण आणि घाटमाथ्यावर जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेचे आरक्षण सहा महिने अगोदरच झाल्यामुळे तिकिट मिळविणे जिकिरीचे होते. त्यामुळे रेल्वे गणपती विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालवतात; मात्र या गाड्यांचे चुकीचे नियोजन असल्याने दरवर्षी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्ता प्रचंड गर्दीच्या सामना करावा लागतोय.

लाडक्या बाप्पाचे आगमन होऊन पाच दिवस पूर्ण झाले आहे, तरीही कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या कमी झालेली नाही. कोकणात जाणाऱ्या मेल- एक्सप्रेस गाड्या भरगच भरून जात आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्याकरिता जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहे. परिणामी रेल्वेचा नियोजनावर कोकण रेल्वे प्रवासी संघटनाकडून नाराजी व्यक्त केली आहे. सध्या कोकणातून गणेशभक्तांचा परतीच्या प्रवास सुरू झालेला आहे. त्यामुळे रेल्वेने तात्काळ लक्ष देऊन प्रवासासाठी अतिरिक्त गाड्यांची सोय करावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघाकडून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular