मागील दोन वर्ष कोकण आणि तळकोकणातील अनेक यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रद्द करण्यात आल्या होत्यात. परंतु यंदा मात्र कोरोनाचे निर्बंध पाळून हि यात्रा पार पडणार आहे. यंदा भराडी देवीची यात्रा २४ फेब्रुवारी २०२२ रोजी आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या यात्रेला कोकणवासीय दूरदूरवरून उपस्थित राहतात. यावर्षी कोरोनाची परिस्थिती आता आटोक्यात येत असल्याने यंदाच्या यात्रेला परवनागी देण्यात आली आहे. यात्रेची तारीख जाहीर केल्याने भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी रेल्वे बुकींग सुरू केले आहे.
महाराष्ट्रातून हजारो भाविक आंगणेवाडीच्या यात्रेला जात असतात. आणि त्याच दरम्यान होळीचा सण देखील असल्याने, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस/दादर–सावंतवाडी रोड दरम्यान आंगणेवाडी जत्रा आणि होळी दरम्यान १० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस– सावंतवाडी रोड विशेष (२ गाड्या)
ट्रेन क्रमांक ०११६१ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस दि. २३.२.२०२२ रोजी २३.४५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला दुसऱ्या दिवशी १०.०० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६२ विशेष सावंतवाडी रोडवरून दि. २४.२.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २३.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
दादर-सावंतवाडी रोड विशेष (८ गाड्या)
गाडी क्रमांक ०११६३ विशेष दादर दि. १६.३.२०२२ ते १९.३.२०२२ पर्यंत दररोज १२.१० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी २३.२० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११६४ विशेष गाडी दि. १७.३.२०२२ ते २०.३.२०२२ पर्यंत दररोज २३.५० वाजता सावंतवाडी रोडवरून सुटेल आणि दादरला दुसऱ्या दिवशी ११.१० वाजता पोहोचेल.
या ०११६१/०११६२ आणि ०११६३/०११६४ जादाच्या गाड्यांच्या आरक्षणासाठी विशेष शुल्कासह बुकिंग ५ फेब्रुवारी २०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. या विशेष ट्रेनमध्ये बसण्यासाठी, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल,अशा सूचना मध्य रेल्वेकडून देण्यात आल्या आहेत.