29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeSindhudurgकोकणात दुग्ध व्यवसायात फायद्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे

कोकणात दुग्ध व्यवसायात फायद्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे

गायी ऐवजी म्हैशीचा दूध व्यवसाय करावा, असे गोकुळ दूध संघाचे अधिकारी तथा मार्गदर्शक योगेश खराडे यांनी सांगितले.

बाजारपेठेत म्हैशीच्या दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. म्हैशीच्या दुधाच्या मागणीच्या कितीतरी पटीने उत्पादन मात्र कमी प्रमाणात होत आहे. महाराष्ट्रात केवळ कोल्हापूर जिल्हा म्हैशीचे दूध उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या दर्जाचे उत्पादन घ्यायचे असेल तर, दुभती जनावरे देखील चांगल्या प्रतीची असणे गरजेचे आहे. यासाठी गोकुळ दूध संघाचे अधिकारी तथा मार्गदर्शक योगेश खराडे यांनी सिंधुदुर्गात हरियाणा राज्यातील निर्मिती असलेल्या मुरा जातीच्या म्हैशींचा दूध व्यवसाय करावा, असा सल्ला स्थानिक व्यावसायिकांना दिला आहे.

दुग्ध व्यवसायात दुधाला फॅट योग्य प्रकारे येणे गरजेचे आहे. योग्य प्रमाणात फॅट मिळाले नाही तर गोकुळ दूध संघ दूध खरेदी करीत नाही. त्यामुळे दूध उत्पादकांत त्यामुळे गोंधळ निर्माण होतो. नुकसान झाल्याने ते अडचणीत येतात;  परंतु, यावर खात्रीशीर उपाय म्हणजे गायी ऐवजी म्हैशीचा दूध व्यवसाय करावा, असे गोकुळ दूध संघाचे अधिकारी तथा मार्गदर्शक योगेश खराडे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण कोल्हापूर जिल्ह्याच्या तुलनेत वेगळे आहे. या जिल्ह्यातील वातावरण दमट आहे; परंतु, हरियाणा राज्यात थंडीत २ ते ३ डिग्री तर उष्णतेत ४८ ते ४९ डिग्री वातावरण राहते. त्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तापमान थंडीत १५ ते १६ डिग्री ते उष्णतेत जास्तीतजास्त ४४ डिग्री होते. त्यामुळे हरियाणा राज्यातील म्हैशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जगतात. त्यांच्यावर हवामान बदलाचा कोणताही विपरीत परिणाम झालेला दिसून येत नाही.

त्याचप्रमाणे, सिंधुदुर्गात मोकळी जागा देखील भरपूर आहे. येथे माळरानावर चारा तयार करण्यासाठी जागा व पाणी मुबलक उपलब्ध आहे. त्यामुळे चाऱ्याचा तुटवडा भासू शकत नाही. मक्या सारख्या चाऱ्याचे उत्पन्न येथे घेण्यास पोषक वातावरण उपलब्ध असल्याने, येथे चाऱ्याची व्यवस्था निर्माण करून पावसाळ्यात आवश्यक चाराही तयार करून ठेवता येवू शकतो, असे खराडे यांनी सांगितले.

म्हैशीचे दूध उत्पादन घेण्यास सुरुवात केल्यास नुकसान कमी आणि फायदा जास्त, असे सूत्र राहत असल्याचा खराडे यांचा विश्वास आहे. मुळात गायी पेक्षा म्हैशी जास्त जीवन जगतात. त्यामुळे म्हैशीची ‘वेत’ जास्त होतात. परिणामी व्यवसाय जास्त कालावधी करता येतो. मात्र, त्या तुलनेत गायीच्या दुधाचा फॅट न लागणे, तिची कमी वेत होणे असे नुकसानीचे अनेक प्रकार असल्याचे खराडे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular