31.7 C
Ratnagiri
Saturday, April 20, 2024

विरोधकांचा सूपडासाफ करून राणे दिल्लीत पोहोचतील : मुख्यमंत्री सावंत

ना. नारायण राणे यांना दिल्लीला पाठवायचेय. यासाठी...

वाटेला गेलात तर बैठकांमध्ये तमाशा करू – अविनाश जाधव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...

कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांचे वेळापत्रक बिघडले

कोकणरेल्वे मार्गावर गुरूवारी ७ रेल्वेगाड्या विलंबाने धावल्याने...
HomeIndiaदेशभरातील सर्व ऐतिहासिक स्थळे, स्मारके मोफत पाहण्यासाठी खुली

देशभरातील सर्व ऐतिहासिक स्थळे, स्मारके मोफत पाहण्यासाठी खुली

केंद्र सरकारने 'आजादी का अमृत महोत्सव'अंतर्गत देशभरातील सर्व ऐतिहासिक स्थळे, स्मारके दहा दिवस नागरिकांना मोफत पाहण्यासाठी खुली करण्याचा आदेश काढला आहे.

‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत विविध योजना आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यातील भारतीय पुरातत्व खात्याकडून एक विशेष योजनेची आखणी करण्यात आल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षी पर्यटकांना दि. ५ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत कार्ल्याची लेणी, शिवनेरी, पाताळेश्वर लेणी, शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, आदी ऐतिहासिक स्थळे, स्मारके येथे विनाशुल्क प्रवेश मिळणार आहेत.

या उपक्रमांतर्गत भारतीय पुरातत्व खात्याच्या पुणे विभागातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे, तसेच आगाखान पॅलेस येथे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबत भारतीय पुरातत्व खात्याच्या पुणे विभागाचे संरक्षक संवर्धक गजानन मंडावरे म्हणाले, ‘नागरिकांना ‘आजादी का अमृत महोत्सव’ उपक्रमाचा आनंद घेता यावा, याकरिता ऐतिहासिक स्थळे, स्मारके येथे मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

देशभरातील केंद्र सरकारने शंभर स्मारकांची निवड केली असून, त्यामध्ये आगाखान पॅलेसचाही समावेश आहे. त्यामुळे तेथे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. तेथे या विशेष वर्षी पन्नास फूट उंच तिरंगा ध्वज फडकविण्यात येईल. दरम्यान, केंद्र सरकारने ‘आजादी का अमृत महोत्सव’अंतर्गत देशभरातील सर्व ऐतिहासिक स्थळे, स्मारके दहा दिवस नागरिकांना मोफत पाहण्यासाठी खुली करण्याचा आदेश काढला आहे.

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे यंदा देशभर ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान २ ऑगस्ट ते १३ ऑगस्टपर्यंत राबवले जात आहे.  या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात अधिक लोकांना जोडण्यासाठी आणि त्यांच्यात देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular