29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriकोकणात मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना

कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना

समुद्रातील हवामान लक्षात घेता मच्छिमारांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, अधूनमधून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार सरी कोसळत आहेत. कोकण आणि घाटमाथ्यावर मंगळवार आणि बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून संपूर्ण राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरला होता. कोकणात गेले काही दिवस विशेष सूर्यदर्शन झालेलेच नाही. इतका पावसाळी वातावरणाचा प्रभाव कायम आहे.

कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रातील हवामान लक्षात घेता मच्छिमारांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे. पावसामुळे यावर्षी जिल्ह्यात आजवर १७९० नागरिकांना फटका बसला आहे. सर्वाधिक दापोली, रत्नागिरी व राजापूर येथील दरडग्रस्त व नुकसान झालेल्या कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. प्रशासन लक्ष ठेवून आहे.

गेल्या महिन्याच्या तुलनेत खूपच मागे असलेल्या पावसाने वेग घेतल्याने कोकणातील शेतकऱ्यांना आधार दिला. मात्र काही ठिकाणी पावसाचे प्रमाण अती झाल्याने शेती पाण्याखाली गेली. कोकणातील रस्ते, साकव, घरे, गोठे यांचे नुकसान झाले आहे. एक दोन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. मंडणगड व दापोली तालुक्यात दोन ठिकाणी घरांना दरडी पडल्याने धोका देखील निर्माण झाला होता. गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत ३२६९ मिमी तर यावर्षी २७०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, बुधवार पर्यंत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्याजवळ राहणाऱ्या त्याचप्रमाणे घाट माथ्याच्या जवळपास अथवा पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे शासनाने आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular