25.1 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriलग्नाचे आमिष दाखवत रत्नागिरीतील महिलेची लाखोंची फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवत रत्नागिरीतील महिलेची लाखोंची फसवणूक

घटना दोन वर्षापूर्वी घडली असून, पाठपुरावा करून देखील दागिने देण्यास नकार देत असल्याने अखेर संशयित विरोधात तक्रार नोंदविण्यात आली.

रत्नागिरी शहरातील कोकणनगर येथील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिचे २ लाख ५० हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना दोन वर्षापूर्वी घडली असून, पाठपुरावा करून देखील दागिने देण्यास नकार देत असल्याने अखेर संशयित विरोधात तक्रार नोंदविण्यात आली. १७ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीमध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणाचा शहर पोलिसांनी तपास घेतला असता संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालया समोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुश्ताक इसा काझी वय ५७ , रा. ब्ल्यु ग्रीन अपार्टमेंट,  अजमेरीनगर, रत्नागिरी असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार अलमिरा इलियाज काझी वय ४५ , रा . कोकणनगर, रत्नागिरी यांच्याशी संशयित मुश्ताक याची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर कालांतराने प्रेमामध्ये झाले. दोघांमध्ये लग्न करण्याचे ठरले होते.

त्यावेळी संशयिताची पत्नी बानू हिने अलमिरा यांच्या आईला सांगितले की, मी व मुश्ताक तुमच्या मुलीला घटस्फोट करवून देतो व बँकेत गहाण ठेवलेले दागिने देखील सोडवून घेतो. असे सांगितल्यानंतर अलमिरा यांच्या आईने ती रहात असलेल्या कोकणनगर येथील घरात रुपये २ लाख ५० हजार आणून दिले. त्यानंतर अलमिरा व संशयित आरोपी मुश्ताक यांनी फायनान्समध्ये गहाण ठेवलेले दागिने सोडवून आणले.

त्यानंतर संशयिताने दागिने पॉलिश करुन घेवून येतो असे सांगून सर्व दागिने अलमिरा यांच्याकडून घेऊन गेला तो अद्याप परतलेलाच नाही. त्यानंतर मग अलमिरा काझी यांनी दागिन्यांबाबत विचारणा केली असता संशयिताने शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अलिमिरा काझी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितास अटक केली. अधिकचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular