अनेक ठिकाणी अशा अजब गजब गोष्टी घडत असतात कि, ज्या ऐकावे ते नवलच. काही प्रकरणे तर अशी असतात कि, कायद्याच्या गर्त्यात ती पिढ्यान पिढ्या सुरूच राहतात. असेच एक चोरीचे प्रकरण सध्या समोर आले आहे. तब्बल २२ वर्षांपूर्वी प्रसिद्ध फॅशन ब्रँड चिराग दिनचे मालक अर्जन दासवानी यांच्या कोलाबा येथील घरावर ८ मे १९९८ रोजी चोरी झाली होती. त्यावेळी चोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून अख्ख्या कुटुंबाला कोंडून ठेवले होते. आणि घरामध्ये एन्ट्री करताना सिक्यॉरिटी गार्डला देखील जखमी केले होते.
कुटुंबियांकडून तिजोरीसह सर्व कपाटांच्या चाव्या हिसकावून घेतल्या गेल्या आणि हि चोरी करण्यात आली होती. यामध्ये दोन सोन्याचे ब्रेसलेट, एक सोन्याचे नाणे तसेच १०० ग्रॅमचे आणि २०० मिलीग्रॅम सोन्याचा समावेश होता. त्यावेळी चोरीला गेलेल्या एकूण सोन्याच्या दागिन्यांची किंमत १३ लाख रुपये इतकी आखण्यात आली होती.
काही दिवसांनंतर पोलिसांनी त्या चोरांच्या गँगमधील ३ जणांना ताब्यात घेतले होते. चोरीच्या काही दिवसांतच सर्व मुद्देमाल पोलिसांना सापडला होता. परंतु, कायद्याच्या भानगडीमुळे, हा मुद्देमाल २२ वर्षे पोलिस स्टेशनमध्येच पडून होता. साहित्य चोरीला गेले तेव्हा त्याची किंमत १३ लाख रुपये होती. आता या मुद्देमालाची किंमत तब्बल ८ कोटी रुपये इतकी झाली आहे.
या प्रकरणात इतर दोन आरोपी फरार असल्या कारणाने जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत कोर्टाने जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांकडेच ठेवण्याचे निर्देश दिले गेले होते. परंतु, इतके वर्ष झाले तरी आरोपी पकडलाच जात नसल्याने फिर्यादींनी आपले सोने परत मिळविण्यासाठी कोर्टाकडे विनंती केली होती. त्यानुसार कोर्टाने पोलिसांकडे २२ वर्षे सुरक्षित असलेलं सोनं त्या कुटुंबाला परत करण्यात आले आहे. कोर्टाच्या आदेशानंतर आता हे सोने अर्जन दासवानी यांचा मुलगा राजू दासवानी यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.