24.7 C
Ratnagiri
Sunday, December 4, 2022

केआरकेने करण जोहरवर केले वादग्रस्त विधान

चित्रपट समीक्षक केआरकेने त्याच्या ताज्या सोशल मीडिया...

आयपीएलमध्ये फुटबॉलसारखी खेळाडू बदली

आता फुटबॉलप्रमाणे क्रिकेटमध्येही खेळाडू बदलताना दिसतो. भारतीय...

मद्रासच्या मंदिरात मोबाईल बंदी, उच्च न्यायालयाचा आदेश

मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूतील सर्व मंदिरांमध्ये मोबाईल...
HomeMaharashtraअंबाबाईचे दर्शन फक्त रांगेतूनच, विशेष सूट कोणालाच नाही

अंबाबाईचे दर्शन फक्त रांगेतूनच, विशेष सूट कोणालाच नाही

कोणत्याही देवस्थानने भाविकांसाठी नियमित रांगे व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने दर्शन घेण्यास परवानगी देण्यात येऊ नये व तशी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये

यंदाच्या नवरात्रोत्सवात पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अंबाबाई मंदिरात दोनशे रुपये आकारून पेड दर्शन देण्यासाठी विशेष रांग करण्याचा निर्णय घेतला होता. त्या विरोधात श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दरखास्त दाखल केली होती. त्याबाबत आज सुनावणी झाली असून कडक आदेश देण्यात आले आहेत. ॲड. नरेंद्र गांधी आणि ओंकार गांधी यांनी मुनीश्र्वर यांच्या वतीने बाजू मांडली. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील लवकर दर्शनासाठी ‘व्हिआयपी पास’ आणि ‘पेड रांग’ थांबवा, असे आदेश तिसरे सहदिवाणी न्यायाधीश के. आर. सिंघेल यांनी आज दिले आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात श्री. मुनीश्वर यांनी दरखास्त केली होती. अंबाबाई मंदिरामध्ये महाराष्ट्र सरकारने देवीच्या दर्शनासाठी कोणत्याही देवस्थानने भाविकांसाठी नियमित रांगे व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने दर्शन घेण्यास परवानगी देण्यात येऊ नये व तशी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये, अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना शासनाने सात सप्टेंबर २०१० ला जाहीर केल्या होत्या. या मार्गदर्शक सूचना अंमलात आणण्यासाठीचा दावा १५ ऑक्टोबर २०१० रोजी मंजूर होऊन शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनां व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने कोणालाही दर्शन देऊ नये म्हणून मनाई केली आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे स्वतंत्र रांग करता येणार नाही, असे श्री. मुनीश्वर यांनी दाखल केलेल्या दाव्यात म्हटले आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील बोलताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला न्यायालयाने दिला आहे. तसेच पत्रकार परिषदेत माहिती देताना, न्यायालयाच्या आदेशाबद्दल विधान करताना वस्तुस्थिती पडताळून न्यायालयाने खरोखरच आदेश दिला आहे किंवा नाही,  हेही पाहावे, असेही न्यायलयाने आदेशात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular