25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriकोकण बोर्ड सतत राज्यात पहिले हवे - पालकमंत्री उदय सामंत

कोकण बोर्ड सतत राज्यात पहिले हवे – पालकमंत्री उदय सामंत

मेहनतीने आणि ताकदीने राज्यात पहिल्या २ क्रमांकात कोकण बोर्ड राहिले आहे.

रत्नागिरीत सर्वांत चांगले ज्ञानदान होत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. कोकण बोर्ड सतत राज्यात पहिले राहिले आहे. ते एक नंबरलाच राहिले पाहिजे यासाठी सांघिकपणाने काम करू, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोकण विभागीय मंडळाच्या नियोजित प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागमंत्री दीपक केसरकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार तथा राज्य मंडळाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विक्रम काळे, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, विभागीय सचिव सुभाष चौगुले, कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष महेश चोथे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एम. कासार उपस्थित होते. पालकमंत्री सामंत म्हणाले, कोकण बोर्डाची मुहूर्तमेढ २०१२ मध्ये रोवण्यात आली. तेव्हापासून मेहनतीने आणि ताकदीने राज्यात पहिल्या २ क्रमांकात कोकण बोर्ड राहिले आहे. त्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मनापासून धन्यवाद देतो. २४ कोटी रुपयांमधून राज्यातील सर्वात देखणी इमारत वर्ष, दीड वर्षात उभी राहील.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले. ज्यांनी ज्यांनी मराठी शिकवली, ज्यांनी ज्यांनी मराठी सुदृढ केली त्या शिक्षकांना आणि साहित्यिकांना याचे श्रेय जाते. नव्या प्रशासकीय इमारतीमधून दरवर्षी ५० हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे ही इमारत नसून मंदिर आहे. कोकण बोर्ड नेहमीच महाराष्ट्रात पहिल्या नंबरवर राहिले पाहिजे यासाठी सांघिकपणाने काम करूया.

बोर्डाची कामगिरी अतिशय चांगली – शालेय शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, ‘कोकण बोर्डाची कामगिरी अतिशय चांगली आहे. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या कारकिर्दीत कोकण बोर्डाची स्थापना झाली आहे.’ आमदार विक्रम काळे, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे या सर्वांचे कोकणावर विशेष लक्ष असते. त्यामुळे आमचे विद्यार्थी बोर्डाला नेहमीच राज्यात अव्वल येतात. त्याबद्दल विद्यार्थी, पालकांचे अभिनंदन करतो.

RELATED ARTICLES

Most Popular