दरम्यान पुढील २४ तासांत कोकण, दक्षिण महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काहीं भागांत ढगफ टीसारखा म्हणजेच १०० ते १५० मिमी पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
चक्रीवादळ घोंघावतंय ! – चक्रीवादळसदृश वाऱ्यांची ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. चक्रीवादळ घोंघावत असून वाऱ्यांची ही दिशा बदलल्यामुळं कोकण, घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यावेळी ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहणार असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मान्सूनचे वारे वेगात – अरबी समुद्रामध्ये एकिकडून मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवास सुरू असतानचा दुसरीकडे तयार होणारी चक्रीवादळसृश्य प्रणाली मान्सूनवर काही परिणाम ि करणार का, असाच प्रश्न अनेकांनी या स्थितीमध्ये उपस्थित केला आहे. दरम्यान तूर्तास तशी कोणतीही शक्यता किंवा चिन्हं दिसत नसून मान्सूनचे वारे त्यांच्या गतीनं पुढे सरकताना दिसत आहेत.
मान्सून ३ दिवसांत केरळला – सध्याच्या घडीला नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात मान्सूननं मागील २४ तासांमध्ये श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला. या वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पूरक स्थिती निर्माण झाल्यानं अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे असणाऱ्या भागातही या वाऱ्यांनी चांगली प्रगती केली आहे. दरम्यान मान्सूनच्या धडकण्यानं मालदीव आणि कोमोरिनच्या आणखी काही भागात मोसमी पाऊस दाखल झाला असून बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात तो दाखल झाला आहे. वाऱ्याची एकंदर गती पाहता पुढील ३ दिवसांत अर्थात रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.