24.4 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeRatnagiriगणेशोत्सवात कोकण रेल्वेची रोजगारसंधी...

गणेशोत्सवात कोकण रेल्वेची रोजगारसंधी…

तात्पुरत्या स्वरूपात स्टॉल उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे.

गणेशोत्सवात कोकणातील रेल्वेस्थानकांवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोकण रेल्वेने पुढाकार घेतला आहे. सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड स्थानकांत तात्पुरत्या स्वरूपात पूजेचे साहित्य, खाद्यपदार्थ यांची विक्री करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने स्थानिकांना दिली आहे. उत्सवकाळात कोकणातील रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. या प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्यरेल्वे, कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने नियमित गाड्यांसह विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन केले आहे. उत्सवादरम्यान सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड येथे तात्पुरत्या स्वरूपात स्टॉल उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंतच्या काळात रेल्वेस्थानकावर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणपती पूजासाहित्य (समई, ताम्हण, घंटी इत्यादी), फुले, दूर्वा, पत्री, अगरबत्ती, धूप, सजावटीच्या वस्तू, मोदक, पेढा, साखरफुटाणे, बर्फीसारख्या खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी पूजास्टॉलचे नियोजन करण्यासाठी स्वयंसहाय्यता गट, महिला बचतगट, वैयक्तिक बिगर सरकारी संस्था यांच्याकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

स्थानिकांनी रेल्वेस्थानकावर स्वतः स्टॉलची उभारणी करायाची असून, यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खाद्यपदार्थांवर एफएसएसएआय प्रमाणपत्र क्रमांक, दर, वजन, उत्पादन तारीख, उत्पादन समाप्ती तारीख अनिवार्य आहे. प्रत्येक स्थानकांसाठी फक्त तीन स्टॉल वितरित करण्यात येतील. उत्सवातील १३ दिवसांसाठी प्रत्येक स्टॉलसाठी दोन हजार रुपये आणि १३ टक्के जीएसटी अशी रक्कम भरावी लागणा आहे, असे कोकण रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular