27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeKokanखराब महामार्गामुळे कोकण रेल्वेला पसंती

खराब महामार्गामुळे कोकण रेल्वेला पसंती

दरवर्षी अनेक भाविक पेणहून गणेशमूर्ती आणतात. यासाठी टेम्पो, ट्रकचा उपयोग केला जातो.

मुंबई-गोवा महामार्ग अनेक वर्ष रखडलेलाच आहे. दरवर्षी गणपती आले की, महामार्गानि गणपती व चाकरमानी येणार अशी फक्त ओरड होते. यंदाही तसे काम पूर्ण झाले नसल्याने खड्डेमुक्त प्रवासाऐवजी विघ्नहत्याने रेल्वेने येण्याची योजना आखली. पेण रेल्वेस्थानक गाठून गणराय कोकणात येणाऱ्या रेल्वेची वाट पाहात बसले. रेल्वे येताच गणरायांनी रेल्वेतून प्रवास करत कोकणाकडे प्रस्थान केले. दरवर्षी अनेक भाविक पेणहून गणेशमूर्ती आणतात. यासाठी टेम्पो, ट्रकचा उपयोग केला जातो.  मात्र, महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे.

त्यातच रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे भाविकांनी यावेळी रस्त्याऐवजी कोकण रेल्वेला पसंती दिल्याचे दिसत आहे. रेल्वेस्थानक ते आपला गाव असा सुखरूप प्रवास केला. गणेशमूर्तीचे प्रमाणही मोठे होते. गेली अनेक वर्षे आम्ही गणेशमूर्ती पेणहून आणतो. यासाठी चारचाकी वाहन आम्ही घेऊन जात होतो. यंदा महामार्गावरील खड्डे पाहता गणेशमूर्ती रेल्वेने आणण्याचा आम्ही निर्णय घेतला व रेल्वेने गणरायांना घरी आणले, असे देवरूख येथील भाविक ऋतुराज देवरुखकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular