25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeRatnagiriविद्यार्थ्यांना शिकू द्या… शिक्षकांना शिकवू द्या…! जिल्ह्यात हजारो शिक्षकांचे किरकोळ रजा आंदोलन

विद्यार्थ्यांना शिकू द्या… शिक्षकांना शिकवू द्या…! जिल्ह्यात हजारो शिक्षकांचे किरकोळ रजा आंदोलन

राज्यातील हजारो शाळेत आज शिक्षक नाहीत, विद्यार्थ्यांना बसण्या योग्य इमारती नाहीत.

विद्यार्थ्यांना शिकू द्या… शिक्षकांना शिकवू द्या… या प्रमुख मागणी करिता शिक्षक समितीकडून मंगळवारी शिक्षक दिनी किरकोळ रजा आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाला जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी पाठिंबा दिल्याने मंगळवारी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाल्याचे दिसून आले. या आंदोलनाची दाखल न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक समितीकडून देण्यात आला आहे. दापोली येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत शिक्षक दिनी छेडण्यात येणाऱ्या किरकोळ रजा आंदोलनाची रूपरेषा ठेवण्यात आली होती.

वेगवेगळ्या उपद्रवी उपक्रमामुळे आणि शिक्षक- मुख्याध्यापकांना मागितल्या जाणाऱ्या माहितीमुळे संपूर्ण शिक्षक त्रस्त झाले आहेत. राज्यातील हजारो शाळेत आज शिक्षक नाहीत, विद्यार्थ्यांना बसण्या योग्य इमारती नाहीत. हजारो शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आसन पट्ट्या, डेस्क-बेंच देखील नाहीत. शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे. अशा या विपरीत परिस्थितीत राज्यातील प्राथमिक शिक्षक कमालीचे वैतागले आहेत, अस्वस्थ आहेत.

त्यांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी आणि शासनाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ने पुढाकार घेऊन शिक्षक दिनाच्या दिवशी सामूहिक किरकोळ – रजेवर जाण्याचा निर्णय घेत हे आंदोलन शंभर टक्के यशस्वी केल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. मंगळवारी बहुतांश शाळांमधील कामकाज पूर्णतः ठप्प असल्याचे दिसून आले. काही शाळांमध्ये नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी शिक्षकांकडून शाळेचे कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र, शिक्षक समितीच्या किरकोळ रजा आंदोलनाचा मोठा फटका मंगळवारी शिक्षण विभागाला बसल्याचे दिसून आले.

RELATED ARTICLES

Most Popular