कोकण रेल्वेने यावर्षीपासून रो रो कारसेवेची घोषणा केली होती. या सेवेला मुदत वाढूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर नियोजित वेळापत्रकानुसार रेल्वेने ही सेवा शनिवारी सुरु केली. केवळ पाच ते सहा कारच्या मालकांनीच या सेवेचा लाभ घेतला. कोकण रेल्वेने शनिवारी कोलाड ते वेर्णा अशी रो रो कार वाहतूक सुरु केली. कोलाड येथून प्रवाशांनी त्यांची वाहने ट्रेनमधून नेण्याची ही पहिलीच सुविधा होती. कोलाड ते वेर्णा अशी ही सुविधा गैरसोयीची असल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून या सेवेला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.
मुंबईकर चाकरमान्यांना कोलाड पर्यंत येवून या सेवेचा लाभ घेणे अवघड होते तसेच वेर्णापर्यंत ही रेल्वे कुठेच थांबणार नसल्याने त्याचा कोणताचा फायदा रत्नागिरी सिंधुदुर्गात होणार नव्हता. यामुळे लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. बुकींगसाठी मुदत वाढवूनही प्रतिसाद दिला गेला नाही. अखेर नियोजित वेळापत्रकानुसार रो रो कारसेवा शनिवारी सुरु झाली. पहिल्याच ट्रेनमधून अवघ्या पाच ते सहा कारच रवाना झाल्या. यामुळे ही सेवा फसल्याचीच चर्चा सुरु होती.