22.2 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriकोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले...

कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले…

विस्कळीत वेळापत्रकामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे गुरुवारी कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांच्या सेवांवर परिणाम झाला. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावल्याने प्रवाशांना स्थानकांवर ताटकळत बसावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-मडगाव स्पेशल रेल्वेला तब्बल ५ तासांचा विलंब झाला. त्याचबरोबर, सीएसएमटी-करमाळी उन्हाळी स्पेशल गाडीही साडेतीन तास उशिराने धावली. याशिवाय, इतर १० रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावरही या पावसाचा परिणाम झाला. विलंबाने धावलेल्या प्रमुख गांड्यांमध्ये सीएसएमटी-करमाळी उन्हाळी स्पेशल (३ तास २५ मिनिटे), उधना-मंगळूर (२ तास ५५ मिनिटे), दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस (१ तास १५ मिनिटे), सीएसएमटी-म डगाव कोकणकन्या एक्स्प्रेस (१ तास २० मिनिटे), एलटीटी-करमाळी वातानुकूलित स्पेशल (१ तास २५ मि निटे), रत्नागिरी-दिवा पॅसेंजर (१ तास ५० मिनिटे), सीएसएमटी-मडगाव म ांडवी एक्स्प्रेस (२ तास ३० मिनिटे), दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस (१ तास १० मिनिटे), एर्नाकुलम-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस (१ तास ५० मिनिटे) आणि निजामुद्दीन एक्स्प्रेस (२ तास) यांचा समावेश आहे.

रेल्वेगाड्यांच्या या विस्कळीत वेळापत्रकामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. एलटीटी-तिरुवअनंतपुरम स्पेशलची २९ मे रोजी अखेरची फ `री दरम्यान, कोकण मार्गावर ३ एप्रिलपासून सुरू असलेल्या एलटीटी-तिरुवअनंतपूरम साप्ताहिक उन्हाळी स्पेशल रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या स्पेशलची अखेरची फेरी २९ मे रोजी असणार आहे. ही स्पेशल एलटीटीहून सायंकाळी ४ वाजता सुटून तिरुवअनंतपूरम येथे त्याच दिवशी रात्री १०.४५ वाजता पोहोचते. परतीच्या प्रवासात तिरुवअनंतपूरमहून पहाटे ४.२० वाजता सुटणारी ही स्पेशल त्याच रात्री १२.४५ वाजता एलटीटीला पोहोचते.

RELATED ARTICLES

Most Popular