दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाड़ी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या जत्रेला उपस्थिती दर्शवतात. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंगणेवाडी जत्रेच्या पार्श्वभूमीवर कोकणरेल्वेने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेवर ट्रेन क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष ट्रेन ०८ फेब्रुवारी २०२६ आणि १० फेब्रुवारी २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०७ वाजून ५५ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री १० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०१००४ मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष गाडी ०७ फेब्रुवारी २०२६ आणि ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ०४ वाजून ३० वाजता मडगाव जंक्शनवरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या ट्रेन करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, सँगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, म ाणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबतील. या ट्रेनला एकूण २२ कोच असतील. यामध्ये २० स्लीपर कोच आणि २ एसएलआर कोच असणार आहेत.
आणि या ट्रेनचे थांबे वेळापत्रकाची सविस्तर माहिती संकेतस्थळाला पाहता येणार आहे. तर, ट्रेन क्रमांक ०१००४ साठीचे तिकीट बुकिंग ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होणार आहे. दरम्यान, आंगणेवाडीची जत्रा ही कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. दरवर्षी डिसेंबर महिन्यात आंगणे कुटुंबीय आणि मानकरी भराडी देवीला ‘कौल’ लावला जातो. देवीचा हुकूम मिळाल्यावरच यात्रेची तारीख निश्चित केली जाते. ३ डिसेंबर रोजी झालेल्या कौलानुसार, ९ फेब्रुवारी २०२६ ही तारीख ठरवण्यात आली. या दीड दिवसांच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी लाखो भाविक आवर्जून उपस्थिती दर्शवतात.

