निर्यात आणि आयात क्षेत्रात कोकण रेल्वेने रत्नागिरीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. आता रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात येथील उत्पादने पाठवता येणार आहेत. याचा शुभारंभगद्रे मरीन एक्सपोर्ट पहिल्या २० मिनी कंटेनर रेकने करण्यात आला आहे. या करिता कोकण रेल्वेने रत्नागिरी रेल्वे स्थानकात स्वतंत्र यंत्रणा सज्ज केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक उत्पादने जगाच्या पाठीवर विविध देशात पाठवली जातात. तशीच विविध उत्पादने येथे आयात ही होतात. यापूर्वी गोव्यातून रवाना होणाऱ्या रेक मधून जिल्ह्यातील उत्पादने निर्यातीसाठी पाठवली जात होती. पण आता कोकण रेल्वेने रत्नागिरी जिल्ह्यातून स्वतंत्र मिनी कंटेनर रेक वाहतूकची यंत्रणा उभी केली आहे. यामुळे आता निर्यात होणारा माल रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात रवाना होणार आहे. याचा शुभारंभ रत्नागिरीच्या गद्रे मरीन एक्सपोर्टच्या निर्यात मालाने करण्यात आला आहे.
गद्रे मरीन एक्सपोर्ट चे पहिले २० पूर्णतः वातानुकूलित मिनी कंटेनर रेक रत्नागिरीतून रवाना करण्यात आले आहेत. कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट, गद्रे मरीन एक्सपोर्ट चे संचालक अर्जुन ि गद्रे, कोकण रेल्वेचे विभागीय वाहतूक प्रबंधक आणि कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थितीत होते. रत्नागिरी स्थानकातून हे पहिले मिनी कंटेनर रेक रवाना करण्यात आले. याकरिता रत्नागिरी रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेकडून स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे.