25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriकोकणवासीयांना हव्यात रेल्वेच्या जादा गाड्या

कोकणवासीयांना हव्यात रेल्वेच्या जादा गाड्या

कोकण रेल्वेमार्गावर फक्त कोकणासाठी स्पेशल ट्रेनची संख्या खूपच कमी आहे.

वाढत्या प्रवासी संख्येला सामावून घेण्यासाठी देशातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्हा रेल्वेने जोडण्यात येत आहे. परंतु कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असतानाही कोकण रेल्वेमार्गावर फक्त कोकणासाठी स्पेशल ट्रेनची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे फक्त कोकणाकरिता जादा गाड्या आणि त्यांना अतिरिक्त थांबे देण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. महाराष्ट्रात सुमारे ५,४६१ कि.मी. लांबीचे रेल्वे मार्ग आहेत. मुंबई, नागपूर, मनमाड, अकोला, पुणे व सोलापूर ही प्रमुख रेल्वे जंक्शन्स आहेत. नागपूर हे भारताच्या मध्यभागी असल्याने पूर्व- पश्चिम तसेच उत्तर- दक्षिण या चारही दिशांना जाणाऱ्या गाड्या तेथून जातात. पश्चिम किनारपट्टीस समांतर रेल्वे असावी या उद्देशानी बांधण्यात आलेला कोकण रेल्वेचा मार्ग हे भारतीय रेल्वेचे एक वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्रातील बहुतेक सर्व महत्त्वाची शहरे लोहमागनि जोडलेली आहेत. परंतु पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेने कोकण, मराठवाडा व विदर्भात रेल्वेचे जाळे फारसे विकसित झालेले नाही. राज्यात मुंबई ते पुणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्राकरिता रेल्वेला गाड्यांची प्रवाशांची सर्वाधिक मागणी आहे. परंतु या मार्गावर गाडयांची संख्या प्रवासी – संख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे. कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्यांना नेहमीच प्रवाशांची प्रचंड मागणी असते. परंतु कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या कोकणासह गोवा- मडगाव आणि दक्षिण भारतात जात असल्याने कोकण वासियांना आरक्षित तिकिट मिळत नाही. त्यामुळे खास करून फक्त कोकणाकरिता गाड्या चालवण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular