27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriक्रांतीनगर हल्लाप्रकरणी नवे वळण, तिघांना पोलीस कोठडी

क्रांतीनगर हल्लाप्रकरणी नवे वळण, तिघांना पोलीस कोठडी

घटना घडली तेंव्हा संशयित फरार असल्या कारणाने नक्की का तलवारीने हल्ला करण्यात आला याचा मागमूस लागत नव्हता.

काही दिवसांपूर्वी क्रांतीनगर येथे राजेंद्र शिवाजी विटकर वय २८, रा.क्रांतीनगर,रत्नागिरी या तरुणावर धारदार तलवारीने वार करणार्‍या दोन संशयिताच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने शुक्रवारी ५ दिवसांची वाढ केली. तसेच त्यांना पळून जाण्यास आणि आपल्या घरी आश्रय देणार्‍या संशयिताची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

घडलेली घटना अशी कि, पूर्वाश्रमिचे मित्र असलेले दोन मुलांचे गट समोर आले. आणि त्यातील एकाने दुसर्या गटाच्या मुलाच्या दुचाकीवर लघुशंका केली त्याबद्दल जाब विचारला असता ती वाढत जाऊन ती भानगड एवढी विकोपाला जाऊन त्याचे रुपांतर एकमेकांवर हात उठण्यापर्यंत गेली. त्याचा सूड उगवण्यासाठी हा हल्ला झाला. परंतु, घटना घडली तेंव्हा संशयित फरार असल्या कारणाने नक्की का तलवारीने हल्ला करण्यात आला याचा मागमूस लागत नव्हता.

गुरुनाथ प्रताप नाचणकर वय २६, रा.मिरजोळे,रत्नागिरी, सुशिल सुनिल रहाटे वय ३३, रा.लक्ष्मी नगर कोळंबे,रत्नागिरी अशी पोलिस कोठडी वाढ करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर सौरभ अर्जुन सावंत वय ३२, रा.सुपलवाडी नाचणे, रत्नागिरी याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. ६ जून रोजी दुपारी राजेंद्रचा गुरुनाथ नाचणकर आणि सुशिल रहाटेशी वाद झाला होता. या रागातून रात्री ८.२०  वा. या दोघांनी राजेंद्रवर धारदार तलवरीने वार करुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

मंगळवारी न्यायालयाने या तिघांनाही १७ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ करुन एकाला न्यायालयीन कोठडी सुनावली.

RELATED ARTICLES

Most Popular