32.3 C
Ratnagiri
Wednesday, December 4, 2024

चिपळूण कापसाळ महामार्गावर गव्यांचा मुक्त संचार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराजवळील कापसाळ येथे...

हापूसचा हंगाम दीड महिन्यानी लांबला…

जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण निर्माण...
HomeSindhudurgएटीएमकार्डद्वारे फसवणूक केलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात

एटीएमकार्डद्वारे फसवणूक केलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात

संशयित सध्या गुजरात पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कुडाळ मधील घोटगे बौद्धवाडी येथील एका वृद्धाच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यातील तीन लाख रुपये लाटल्या प्रकरणी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कणकवली पोलिस पथकाने मिळालेल्या माहितीवरून, आंध्रप्रदेशातील तिरुपती येथे वास्तव्याला असलेल्या एस. कृष्णमूर्ती रेड्डाप्पा वय ५२ याचा माग काढला आहे.  मात्र, संशयित सध्या गुजरात पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मे २०२२ च्या दरम्यान हे प्रकरण घडले असून याबाबत येथील पोलिसात गुन्हाही दाखल आहे. पोलीस त्याचा तपास करतच असताना याबाबत गुप्त माहिती मिळाली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, घोटगे येथील सीताराम विठोबा कदम वय ७० यांनी शेजारील एका युवकाला एटीएम देऊन त्यातून काही रक्कम काढण्यास सांगितले होते; मात्र, त्या तरुणाला ही रक्कम एटीएम मधून काढायला जमत नव्हती. नेमकं त्याचवेळी शहरातील एका बँकेच्या एटीएम बाहेर असलेल्या एका संशयिताने त्याच्या कडून एटीएम घेऊन त्याची हातचलाखीने अदलाबदली केली होती. त्यावेळी एटीएममधून पैसे येत नाही असे करण सांगितले आणि त्या तरूणाला एक एटीएम कार्ड परत केले, मात्र, ते कार्ड सीताराम कदम यांचे नव्हते हे काही अवधी गेल्यानंतर लक्षात आले.

त्यामुळे कदम यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद येथील पोलिस स्थानकात दाखल केली. संशयिताने एटीएमकार्डद्वारे १० मे रोजी कुडाळ आणि कणकवलीमध्ये त्यातील रक्कम काढली. तसेच त्या कार्डच्या माध्यमातून रत्नागिरी येथे सोन्याच्या दागिन्यांची देखील खरेदी केली. तपासासाठी उपनिरीक्षक अनिल हडळ महिन्याभरापासून कठोर परिश्रम करत होते. दरम्यान, गुजरात पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. कोठडीची मुदत संपताच कणकवली पोलिस त्याला ताब्यात घेणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular