27.3 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeRatnagiriकुंभार्ली घाट रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक

कुंभार्ली घाट रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक

कुंभार्ली घाटात काही दिवसांपूर्वी मातीची दरड कोसळली होती.

वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या कुंभार्ली घाट रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुसळधार पावसामुळे घाट रस्ता कोणत्याही क्षणी बंद पडेल अशी स्थिती आहे. घाटातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीवर १३ कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतरही हा घाट रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पाटण तालुक्यातील वझेगाव येथे रस्ता वाहून गेल्यानंतर गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग १७ दिवस बंद होता. त्यावेळी कुंभार्ली घाट रस्त्याची दुरुस्ती करणे सार्वजनिक बांधकाम विभागाला शक्य होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. मे महिन्यात पडलेला पाऊस वगळता जून व जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झालेला नाही. तरीही घाट रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. ठिसूळ संरक्षक कठडे, गटारांची दुरवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने जागोजागी पडलेली भगदाडं, दरडी कोसळण्याचा कायम असलेला धोका यामुळे यावर्षी कुंभालीं घाट धोकादायक स्थितीत आहे.

कुंभार्ली घाटात काही दिवसांपूर्वी मातीची दरड कोसळली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने ती तत्काळ हटवली. मात्र, दरडी कोसळू नये, यासाठी बोल्डर नेटचा वापर करण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी नेट बसविण्यात येतील, तिथे दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी होत आहे. याशिवाय डोंगरातील लहान-मोठे दगड कोसळले तर ते जाळीत अडकून बसतात. एखाद्या वाहनांवर थेट दगड पडण्याचा धोका नसतो; परंतु गेल्या आठ ते दहा वर्षांत अशा स्वरुपाच्या नेटचा वापरली गेलेली नाहीत. दरडी कोसळल्यानंतर त्या हटवून मार्ग मोकळा करण्यातच धन्यता मानली जाते. रात्री अपरात्री दरडी कोसळल्यास महामार्ग बंद ठेवावे लागतो. परंतु, त्यामधून कोणताही धडा प्रशासनाने घेतलेला नाही. या मार्गावर कोणत्याही क्षणी दरडी कोसळतील अशी १२ हून अधिक ठिकाणे असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

घाटरस्त्यांच्या डोंगराकडील बाजूने वाहून येणाऱ्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने न केल्यामुळे रस्त्यावरील डांबराचा थर वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी केवळ खडी दिसत आहे. तर काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पोफळीतून जाताना कुंभार्ली घाट सुरू होतो. घाटातील प्रवेशद्वारावरील रस्ताच वाहून गेलेला आहे. पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल, याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे गटारातील सर्व पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे रस्ता खचण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच वाहून गेलेल्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून राहतात. पावसाळ्यापूर्वी घाटरस्त्यांवरील गटारांची साफसफाई केली जाते. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे यंदा दिसत आहे. एखाद्या ठिकाणी रस्त्याला छोटा खड्डा पडलेले असेल तर तो तातडीने बुजवून टाकला जात नाही. त्यामुळे घाटातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झालेले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular