28.8 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

रत्नागिरीत अमली पदार्थ बाळगणारे ७ जण अटकेत

शहराजवळील भाट्ये गावामध्ये गांजा बाळगणाऱ्या ५ तरुणांविरुद्ध...

रत्नागिरी पालिकेत ५५ कंत्राटींना डच्चू…

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रत्नागिरी पालिकेने आर्थिक शिस्त...

७२ तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, चर्चाना फुटलंय पेव

तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा...
HomeRajapurस्वतःचा जीव धोक्यात घालून, महिलेने वाचविले वासराचे प्राण

स्वतःचा जीव धोक्यात घालून, महिलेने वाचविले वासराचे प्राण

त्यांनी बिबट्याच्या दिशेने बॅटरीचा प्रकाश झोत मारला आणि मोठमोठ्याने आरडाओरड करायला सुरुवात केली.

जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आसपासच्या परिसरामध्ये मागील दोन दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. भुकेसाठी बिबट्या पाळीव प्राण्यांवर हमला करून त्यांना शिकार बनवत आहेत. मानवी वस्तीत दिवसाढवळ्या बिबट्याच्या संचाराने काहीसे भीतीदायक वातावरण परिसरात निर्माण झाले आहे.

कुवेशी येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. मात्र महिलेने स्वतःचा जीव धोक्यात घालून वासराचे प्राण वाचवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. राजापूर तालुक्यातील कुवेशी गावात बळवंत राम शिर्के यांच्या घराशेजारी प्रभाकर लक्ष्मण लिंगायत यांची गुरे झाडाखाली उभी होती. रात्री ९.३० ते १० च्या सुमारास काळोखाची संधी साधत बिबट्याने त्यातील एका वासरावर झडप घातली आणि वासराच्या मानेला चावा घेतला.

अचानक झालेल्या हल्ल्याने भेदरलेल्या इतर गायी, वासरांनी हंबरडा फोडला. गुरांचा आवाज ऐकून शेजारच्या घरातील बळवंत शिर्के यांच्या पत्नी दरवाजा उघडून त्या दिशेने वेगाने धावत गेल्या.आणि त्यांनी बिबट्याच्या दिशेने बॅटरीचा प्रकाश झोत मारला आणि मोठमोठ्याने आरडाओरड करायला सुरुवात केली. यावेळी आवाजामुळे बिबट्या वासराला तिथेच सोडून धूम पळाला. आणि त्यांनी बिबट्याच्या तावडीतून वासराला सोडवून आपल्या घरी आणले.

गावच्या सरपंच मोनिका कांबळी यांना शिर्के यांनी घडलेल्या घटनेची खबर दिली. सरपंच मोनिका कांबळी यांच्यासह तंटामुक्त समिती अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते मनोहर कांबळी यांनी घटनास्थळी जावून वासराची पाहणी केली. तसेच पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. यशवंते यांच्याशी संपर्क साधून वासरावर उपचार करण्यास सांगितले.  दरम्यान १५  दिवसांपूर्वी सड्यावर दिवसाढवळ्या बळवंत शिर्के यांच्या गोठ्यातील एक वासरू बिबट्याने मारले होते. त्यानंतर आता घराच्या जवळ येत पाळीव जनावरांवर हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular