बारसूमध्ये पोलिसांच्या फौजेसाठी रोज लाखो रूपयांचे जेवण, मात्र पोलीस अर्धपोटीच ?

75
Lakhs of rupees daily food for police force in Barsu

बारसू येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनता प्राणपणाने विरोध करताना दिसत असून पोलीस फौजफाट्याच्या जोरावर माती परीक्षण रेटून नेण्याचे काम प्रशासन करत असल्याचा आरोप होत आहे. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता बारसू परिसरात तब्बल २ हजाराहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून या फौजेसाठी रत्नागिरीतून जेवण मागवण्यात येत आहे. त्यासाठी दररोज २ ते अडीच लाख रूपये खर्च होत आहे. विशेष म्हणजे पोलिसांना दुपारी आणि रात्री नेमकचं जेवण दिलं जात असल्याने पोलिसांना अर्धपोटीच बंदोबस्तावर रहावे लागत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी २४ एप्रिलपासून माती परीक्षण सुरू करण्यात आले. या नाती परीक्षणाला तीव्र विरोध करत आसपासच्या गावातील शेकडो गावकऱ्यांनी बारसूच्या सड्यावर आंदोलन सुरू केले. आंदोलक आक्रमक होताच त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर देखील केल्याचे आरोप होत आहेत.

छावणीचे स्वरूप – संपूर्ण बारसू आणि परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या परिसराला जणू काही छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सरकारच्या आदेशावर बंदोबस्तासाठी बारसूमध्ये तैनात केलेल्या पोलिसांच्या खानपानाची व्यवस्था एमआयडीसी आणि रिफायनरी कंपनीने घेतल्याची चर्चा सुरू आहे.

पोटभर जेवण नाही – रणरणत्या उन्हात पोलिसांना बंदोबस्तावर नेमण्यात आले आहे. त्यांना २ वेळेचे जेवण दिले जात असले तरी ते पोटभर नसल्याच्या तक्रारी येत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोट भरेल इतके जेवण दिले जात नाही असा आरोप होतो आहे. रत्नागिरीतून हे जेवण रोज मागविले जाते. दररोज २ ते अडीच लाख रूपये त्यासाठी खर्च होतात. बंदोबस्तावरील पोलिसांना पोटभर जेवणही मिळत