20.3 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeIndiaचारा घोटाळा प्रकरणी लालूप्रसाद यादव यांसह ३८ दोषींना शिक्षा आणि दंड

चारा घोटाळा प्रकरणी लालूप्रसाद यादव यांसह ३८ दोषींना शिक्षा आणि दंड

सीबीआय विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव याना ५  वर्षाचा तुरुंगवास, ६० लाख रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

देशभर गाजत असलेल्या चारा घोटाळा प्रकरणाचा अखेर न्यायालयाने निकाल दिला असून त्यामध्ये लालू प्रसाद यादव यांच्यासह ३८  दोषींना कोणती शिक्षा होणार याकडे साऱ्यांच्या नजरा केंद्रित झाल्या होत्या. बिहारमध्ये चारा घोटाळ्यात डोरंडा कोषागारामधून १३९.३५ कोटी बेकायदेशीरपणे काढल्या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह ३८ दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सीबीआय विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव याना ५  वर्षाचा तुरुंगवास, ६० लाख रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. आता न्यायालयाच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे लालू प्रसाद यादव यांच्या वकीलांनी सांगितले आहे. तिथे लालुंसाठी जामीन अर्ज दाखल केला जाईल. लालूप्रसाद यांनी या प्रकरणी अर्धी शिक्षा देखील भोगली असल्याचा युक्तीवाद देखील केला गेला आहे.

सध्या लालू ७३ वर्षांचे आहेत. त्यामुळे आम्ही न्यायालयात प्रकृती अस्वास्थाचे कारण दिले होते, असे त्यांचे वकील म्हणाले. सोमवारी विशेष सीबीआय न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लालू यादव यांच्यासह याप्रकरणातील ३८ दोषींनाही शिक्षा सुनावली.

१५ फेब्रुवारीला सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशी यांनी या सर्वांना दोषी ठरवले आणि शिक्षेवरील सुनावणीसाठी २१ फेब्रुवारीची तारीख निश्चित केली होती. या प्रकारणात सीबीआयने एकुण १७० आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते,तर २६ सप्टेंबर २००५ ला १४८ आरोपींवर आरोप निश्चित करणयात आले होते. चार वेगवेगळ्या चारा घोटाळा प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह ९९ जणांविरुद्ध सर्व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाल्याने २९ जानेवारीला आपला निकाल राखुन ठेवला होता.

RELATED ARTICLES

Most Popular