तालुक्यातील वाटद एमआयडीसीमध्ये उद्योगपती अनिल अंबानी यांचा संरक्षण विभागाचा धीरुभाई अंबानी डिफेन्स लिमिटेड हा मोठा शस्त्र, स्फोटके, दारुगोळा निर्मितीचा प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी सुमारे साडेनऊशे हेक्टर जमिनीचे भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. यावर ११४ हरकती आल्या असून भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर सुनावणी प्रक्रिया घेण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्प उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. महसूल विभागाने याला दुजोरा दिला. उद्योगपती अनिल अंबानी यांचा कोकणातील वाटद (ता. रत्नागिरी) संरक्षण विभागाचा धीरुभाई अंबानी डिफेन्स लिमिटेड हा मोठा प्रकल्प सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आर्थिक वर्ष २०२७ च्या अखेरीस १५५ मिमी दारूगोळा आणि अॅग्रीगेट्सच्या निर्यातीतून ३००० कोटी रुपये कमविण्यांचे उद्दिष्ट ठेवले आहे.
कंपनी चालू आर्थिक वर्षातच १५०० कोटी रुपयांच्या मोठ्या कॅलिबर दारूगोळा निर्यात करण्याचा अंदाज व्यक्त करत आहे. अहवालानुसार, कंपनीने आतापर्यंत १०० कोटी रुपयांचे तोफखाना दारूगोळा आणि संबंधित उपकरणे निर्यात केली आहेत. रिलायन्स डिफेन्स लिमिटेड कंपनी कोकणात धीरुभाई अंबानी डिफेन्स सिटी उभारणार आहे. या प्रकल्पासाठी रत्नागिरीतील वाटद औद्योगिक परिसरात १००० एकर जमीन देण्यात आली आहे. येथेच धीरुभाई अंबानी डिफेन्स सिटीमध्येच रिलायन्स डिफेन्स लिमिटेड कंपनी उभारली जाणार आहे. या कंपनीत स्फोटके, दारूगोळा आणि लहान शस्त्रे तयार केली जाणार आहेत. या डिफेन्स प्रोजेक्ट अंतर्गत पुढील १० वर्षात कंपनी १० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.
या प्रकल्पासाठी जगातील सहा आघाडीच्या संरक्षण कंपन्यांसह करार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारी सुमारे साडेनऊशे हेक्टर जमीन भूसंपादनाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच भूसंपादन पूर्ण होणार असून याचा आराखडा तयार करून आलेल्या ११४ हरकतींवर सुनावणी होणार आहे.
सहा कंपन्यांशी होणार करार – या डिफेन्स प्रकल्पअंतर्गत पुढील १० वर्षांत कंपनी १० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पासाठी जगातील सहा आघाडीच्या संरक्षण कंपन्यांसह करार केला जाणार आहे.