21.1 C
Ratnagiri
Sunday, December 21, 2025

दापोलीतील पन्हळेकाजीत आढळला कोकणातील सर्वात प्राचीन शिलालेख

दापोली तालुक्यातील पन्हळेकाजी येथे कोकणातील सर्वात प्राचीन...

२४ तासात राज्यात थंडीची तीव्र लाट…

महाराष्ट्रातील तापमानात मागील दोन दिवसांपासून चढ-उतार पाहायला...

रत्नागिरीत प्रभाग १० मध्ये आज नगरसेवक निवडण्यासाठी मतदान

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्र. १० मध्ये...
HomeRatnagiriलांज्यात ७ वर्षीय मुलीने केली आत्महत्या, घातपाताचा संशय

लांज्यात ७ वर्षीय मुलीने केली आत्महत्या, घातपाताचा संशय

सुट्टीत वडिलांकडे आलेल्या आर्या या अवघ्या सात वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एका पाठोपाठ झालेल्या लहानग्यांच्या आत्महत्येने जिल्हा हादरून गेला आहे. लांज्यातील कोर्ले गावातील ७ वर्षीय मुलीचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. आर्या राजेश चव्हाण असं या मुलीचं नावं आहे. सुट्टीत वडिलांकडे आलेल्या आर्या या अवघ्या सात वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पण सातारा फलटण येथील नातेवाईकांनी यावर संशय व्यक्त करत हा प्रकार घातपाताचा असल्याचा आरोप केला आहे.

ही धक्कादायक घडना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृत मुलीच्या आई- वडिलांमध्ये बऱ्याच काळापासून काही अंतर्गत वाद असल्याने ते वेगळे राहतात. आई सातारा फलटण येथे तर वडील लांजा कोर्ले येथे राहायला असतात. सर्व प्रथम तिच्या मोठ्या बहिणीने लहान बहिणीने फास घेतल्याचे पाहिले. तेव्हा हा धक्कादायक प्रकार सर्वांसमोर आला. यावेळी मोठी बहीण शेजारी गेली होती. ती आल्यावर तीला हा प्रकार दृष्टीस पडला.

आर्याच्या आपल्या राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. आर्याच्या वडिलांनी दोन लग्न केली आहेत. पहिल्या पत्नी पासूनची आर्या ही सर्वात लहान मुलगी आहे. आर्याचा घातपात की आत्महत्या असा संशय आता व्यक्त केला जातोय. आर्याची आई सातारा फलटण येथील आहे. सातारा फलटण येथील नातेवाईकांनी ही हत्या असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणा बाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दादासाहेब गुटुकडे करीत आहेत. शवविच्छेदन करता आर्याचा मृतदेह रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. लांजा पोलिस यावर अधिक तपास करत असून, नेमक सत्य काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular