लांजा तालुक्यातील भांबेड लक्ष्मीनगर येथे वडिलांच्या मृत्युनंतर बाराव्याच्या दिवशी प्रॉपर्टीच्या वादातून दोघा सावत्र मुलांनी आणि सुनेने आईला मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेनंतर रात्री ११.२० वाजता लांजा पोलिस ठाण्यात दोन्ही मुलगे आणि सून अशा तिघांवर लांजा पोलीस ठाण्यात सावत्र मुलगे रोहन व ऋषिकेश मिरजकर तसेच सून धनश्री अशा तिघांवर स्वाती मिरजकर यांच्या फिर्यादीनुसार भादवि कलम ३२४, ३२३, ५०४,५०६, ४२७ व २७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव हे करत आहेत.
लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद सावत्र आई स्वाती राजेंद्र मिरजकर वय ५० यांनी लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. पती राजेंद्र मिरजकर यांचे बारावे विधीचे कार्य होते. याच दिवशी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान प्रॉपर्टीच्या वादातून सावत्र आई आणि मुले यांच्यात वाद निर्माण झाला या वादाचे रूपांतर मारहाणी झाले.
प्रॉपर्टीच्या वाटपाची मिटिंग घेत असताना रोहन मिरजकर याने सावत्र आई स्वाती मिरजकर हिला शिवीगाळ करत तिचे डोके भिंतीवर आपटले. यामध्ये स्वाती मिरज ही जखमी झाली. तर याच वेळी सून धनश्री हिने हाताच्या ठोशाने पाठीवर मारहाण करून दुखापत केली. हे भांडण सोडवण्यासाठी स्वाती यांची बहीण कल्पना सचिन शेट्ये वय ३९, रा. डोंबिवली तिथे आल्या असता रोहन मिरजकर याने त्यांचे केस ओढले तर सून धनश्रीने मारहाण केली. यावेळी उपस्थित गावातील लोक रोहन याला भांडणातून बाजूला घेत असताना, त्याने स्टील धातूचा तांब्या फेकून मारला. यामध्ये रेश्मा शैलेंद्र मलुष्टे वय ४१, रा. डोंबिवली या जखमी झाल्या.
तसेच रुषिकेश, रोहन व धनश्री मिरजकर यांनी दोघा सावत्रभाऊ जय मिरजकर वय १५ व यश मिरजकर वय १७ यांना देखील शिवीगाळ केली. तसेच तुमचा इथे काही संबंध नाही. आमचे घर आहे असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली अशी तक्रार स्वाती मिरजकर यांनी पोलिस ठाण्यात केली आहे.