27.8 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeRatnagiriलांजा विकास आराखड्याला स्थगिती देण्यासाठी प्रयत्न करणार : ना. राणे

लांजा विकास आराखड्याला स्थगिती देण्यासाठी प्रयत्न करणार : ना. राणे

प्रारूप विकास आराखड्याला नागरिकांचा असलेला विरोध आणि लोकांची बाजू समजावून घेवून राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून प्रारूप विकास आराखड्याला स्थगिती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठोस आश्वासन लांजा-कुवे बन्नाव समितीला दिले आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ना. नितेश राणे यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती पत्रकारांना दिली. लांजा नगरपंचायतीच्यावतीने २७ मार्च २०२५ रोजी लांजा शहराचा प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात ओला होता. या आराखड्यासंदर्भात हरकती घेण्यासाठी २८ एप्रिल ही शेवटची तारीख देण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या प्रचंड रोषामुळे ही मुदत १५ मे पर्यंत वाढवून देण्यात आली. मुदत संपल्यानंतर विकास आराखड्या विरोधात नगरपंचायतीकडे तब्बल १५०० हरकती अर्ज आले होते. या हरकतींवर आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४ ते ७ ऑगस्ट दरम्यान सुनावणी होणार आहे.

नागरिकांचा आक्षेप – असे असले तरी मुळातच हा प्रारूप विकास आराखडा (डीपी) तयार करताना लोकांना विश्वासात न घेता तो कार्यालयात बसून तयार केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. कारण या विकास आराखड्यामुळे लांजा कुवे शहरातील नागरिकांची घरेदारे व गोठे उध्वस्त होणार आहेत. हा प्रारूप विकास आराखडा लोकांच्या घरादारांवर नांगर फिरवणारा ठरणारा आहे, असा त्यांचा दावा आहे. असंख्य त्रुटी या विकास आराखड्यात आहेत. त्यामुळे या विकास आराखड्याला स्थगिती मिळावी यासाठी लांजा – कुवे बचाव समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून गेल्या ४ महिन्यांपासून त्या विरोधात शासन दरबारी लढा सुरू आहे. यामध्ये खासदार नारायण राणे, पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्याकडेदेखील पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

राणेंनी बाजू समजून घेतली – या पार्श्वभूमीवर रविवारी २७ जुलै रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची लांजा – कुवे बचाव समितीच्या पदाधिकारी यांनी भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी लांजा – कुवे बचाव समिती पदाधिकारी व नागरिकांची बाजू समजावून घेवून या विकास आराखड्याला स्थगिती मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ठोस ग्वाही त्यांनी दिली आहे. यासाठी. आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून नागरिकांची असलेली रास्त मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यांच्या माध्यमातून या विकास आराखड्याला स्थगिती मिळवून देण्यासाठी आपण ठोस प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी लांजा – कुवे बचाव समितीला दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular