25.3 C
Ratnagiri
Friday, December 13, 2024

सावर्डेतील उद्योजकावर ‘जीएसटी’चा छापा…

सावर्डे परिसरातील बड्या उद्योजकावर जीएसटी विभागाने फिल्मी...

विहिंपच्या कार्यकर्त्यांनी रोखली गायींची तस्करी

पोमेडी परिसरातून पाच गायी आणि एक वासरू...

खाड्यांच्या मुखाशीच साचू लागला मोठ्या प्रमाणात गाळ

भारत आफ्रिकेपासून तुटला त्या वेळी ज्या भेगा...
HomeRatnagiriवेरळ येथे दुसऱ्या दिवशी देखील काही तास वाहतूक बंद

वेरळ येथे दुसऱ्या दिवशी देखील काही तास वाहतूक बंद

ठप्प झालेली महामार्गावरील वाहतूक रात्री १० वाजता म्हणजेच ८ तासांनंतर सुरळीत झाली.

मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा वेरळ येथे यु आकाराच्या अवघड वळणावर शुक्रवारी सकाळी एक कंटेनर आणि संध्याकाळी देखील त्याच जागेवर दुसरा कंटेनर उलटल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असून, ठप्प झालेली महामार्गावरील वाहतूक रात्री १० वाजता म्हणजेच ८ तासांनंतर सुरळीत झाली. मात्र बाजूला केलेले दोन्ही कंटेनर अन्यत्र हलविण्यासाठी शनिवारी पुन्हा महामार्गावरील वाहतूक तीन तास बंद करण्यात आली होती.

वेरळ येथील यू आकाराच्या वळणावर शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गोवा ते मुंबई मच्छी वाहतूक करणारा कंटेनर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली होती. केवळ दुचाकी व मोटार यासारखी लहान वाहने ये-जा करू शकत होतीत. त्यानंतर सायंकाळी सात वाजता हा कंटेनर क्रेनने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. काही प्रमाणात वाहतूक सुरू होताच, याच यु आकाराच्या वळणावर मुंबईकडे जाणारा दुसरा कंटेनर उलटला. त्यामुळे पुन्हा महामार्ग ठप्प झाला होता.

पहिला कंटेनर काढून रत्नागिरीच्या दिशेने निघालेल्या दोन क्रेन पुन्हा बोलवण्यात आल्या. महामार्गावर वाहने उभी असल्याने या क्रेन घटनास्थळी पोहोचण्यास वेळ लागला. रात्री दहा वाजता हा कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरू करण्यात यश आले. हा कंटेनर महामार्गावर उलटल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहने उभी होतीत. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही कंटेनर बाजूला करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी चार वाजता अन्यत्र हलविण्यात आले. तीन तासांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. वेरळ येथील यु आकाराच्या वळणावर सातत्याने अपघात होत असल्याने गणेशोत्सवापासून दोन होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular