25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeIndiaविधानसभा निवडणुकीमध्ये ४ राज्यात भाजपची मुसंडी, आता लक्ष महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीमध्ये ४ राज्यात भाजपची मुसंडी, आता लक्ष महाराष्ट्र

भाजप नेत्यांकडून उत्तर प्रदेश झाँकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं अशा उत्साहात घोषणा देण्यात आल्या आहेत.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल काल स्पष्ट झाले. पाच पैकी चार राज्यात भाजपचा मोठा विजय पाहायला मिळाला. या दमदार यशामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही मोठ्या प्रमाणात जोश आला आहे. विधानसभा निवडणुकांत अनेक मुरलेल्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामध्ये दोन विद्यमान आणि पाच माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. विद्यमानांपैकी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे पराभूत झाले आहेत.

पंजाबमध्ये प्रकाशसिंग बादल, अमरिंदर सिंग आणि राजिंदर कौर भट्टल या तीन माजी मुख्यमंत्र्यांना पराभावाला सामोरे जावे लागले आहे. तर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीष रावत विधानसभेवर निवडून येण्यात अयशस्वी ठरले आहेत. त्याशिवाय, गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांचाही दारूण  पराभव झाला आहे.

पाच राज्यांतून समोर आलेल्या निकालानंतर त्याचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होईल, अशी आशा आता भाजप नेत्यांना आहे. भाजपने चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारल्यानंतर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाच्या चर्चांना मोठ उधाण आलं आहे. उत्तर प्रदेशातील घवघवीत यशानंतर पुढचं लक्ष्य महाराष्ट्र असल्याच्या जाहीर घोषणा भाजप नेत्यांकडून देण्यात येत आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकातही भाजप बाजी मारेल, असा विश्वास भाजप आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, भाजप नेत्यांकडून उत्तर प्रदेश झाँकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं अशा उत्साहात घोषणा देण्यात आल्या आहेत. चार राज्यांच्या निकालानंतर भाजप मुंबई महापालिकेत देखील मुसंडी मारेल असा विश्वास भाजप नेत्यांना आहे. तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाल्याची चर्चा सध्या सुरू आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular