24.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriबिबट्यांचा १२० गावांमध्ये वावर, जिल्ह्यात संख्या वाढली

बिबट्यांचा १२० गावांमध्ये वावर, जिल्ह्यात संख्या वाढली

गेल्या दहा वर्षांत या चार तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांमध्ये बिबट्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अधिवास धोक्यात आल्यामुळे बिबट्यांचा मानवीवस्तीजवळील आढळ अधिक आहे. रत्नागिरी वनविभागातील ४ तालुक्यांमधील १२० गावांत बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. मागील १९ महिन्यांत ४ तालुक्यांमध्ये वनविभागाने रेस्क्यू केलेल्या बिबट्यांपैकी २१ बिबट्यांचा मृत्यू झाला असून, २३ बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले, तसेच दोन बछड्यांना सातारा येथील टी. टी. सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. जिल्ह्याचा विचार करता दक्षिण रत्नागिरीत बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पूर्वी क्वचित बिबट्याचे दर्शन व्हायचे; पण आता रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर या भागात आठवड्यातून २-३ किंबहुना अधिक बिबटे आढळत आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे काम, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड आदी या कारणांमुळे बिबट्या आता मानवीवस्तीत येऊ लागला आहे. पूर्वी बिबट्यांचा वावर इतका नव्हता, तो आता अधिक प्रमाणात वाढला आहे.

भक्ष्याच्या शोधात ते मानवीवस्तीत दिसू लागले आहेत. वनविभागाने केलेल्या पाहणीमध्ये गेल्या दहा वर्षांत या चार तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बिबट्याचे जंगलातील काही भागांवर अधिराज्य असते. दुसऱ्या बिबट्याला तो त्या भागात घुसखोरी करून देत नाही. त्यामुळे वारंवार बिबट्यांमध्ये होणारी लढाई त्यांच्या जीवावर बेतते. अशा काही प्रकारामध्ये दोन बिबट्यांचा जखमी होऊन मृत्यू झाला आहे. बिबट्यांचा अधिवास धोक्यात आल्यामुळे आणि जंगलातील नैसर्गिक साखळीचा समतोल न राहिल्याने ते भक्ष्याच्या शोधात मानवीवस्तीमध्ये अधिक दिसू लागले आहेत. गेल्या वर्षी एकूण २८ बिबट्यांचे वनविभाग रत्नागिरीने रेस्क्यू केले. त्यामध्ये २८ बिबट्यांपैकी १३ बिबट्यांचा मृत्यू झाला. कुठे विहिरीत पडल्याने मृतावस्थेत आढळून आले, फासकीत

अडकून किंवा वाहनाच्या धडकेत मृत झालेल्यांचा यामध्ये समावेश आहे. रेस्क्यूमधील १५ बिबट्यांना सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यंदा २०२५ मध्ये वनविभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, एकूण १८ बिबट्यांचा शोध लागला; पण त्यात ८ मृत्यू झाल्याचे कळते. ८ बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले तर १ टी. टी. सेंटरला पाठवण्यात आला. रत्नागिरी वनविभागातील ४ तालुक्यांमधील सुमारे १२० गावांमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

ब्लॅक पँथरचेही दर्शन – संगमेश्वर, राजापूर तालुक्यात ब्लॅक पँथर यापूर्वी आढळले आहेत. नुकताच रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथेही चार दिवसांपूर्वी ब्लॅक पँथरचे दर्शन झाले. त्याच्याबरोबरच बिबट्याही या ठिकाणी एकत्र दिसले. त्या ठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चाही केली.

RELATED ARTICLES

Most Popular