25.8 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriऔरंगजेबाची कबर उखडून टाकण्यासाठी लाँग मार्च काढू - मंत्री नीतेश राणे

औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यासाठी लाँग मार्च काढू – मंत्री नीतेश राणे

स्मारकाला स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाइज असे नाव द्यावे, अशी मागणी केली.

छत्रपती संभाजी महाराज यांचे कसबा येथे असे स्मारक उभारू की, जगभरातील सर्वजण या ठिकाणी येऊन नतमस्तक होऊन जातील, असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय मंत्री आणि रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री नीतेश राणे यांनी केले. तसेच औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यासाठी लाँग मार्च काढू, असा इशाराही त्यांनी दिला. कसबा शास्त्रीपूल या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षण दिन समितीच्यावतीने संभाजी महाराज धर्मरक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री नीतेश राणे म्हणाले, औरंगजेबाची निशाणी नष्ट केली आहे. आता औरंगजेबाची कबर उखडून काढू. सरकारने काढली नाही, तर आम्ही काढू. कबर काढण्यासाठी लाँग मार्च काढू. आम्ही हिंदू म्हणून व्यासपीठावर आहोत. छत्रपती संभाजी महाराज यांचे असे स्मारक उभारू की, जगभरातील सर्व या ठिकाणी येऊन नतमस्तक होऊन जातील.

हिंदू नावे लागली आहेत ती धर्मवीर संभाजी महाराजांच्यामुळे लागली आहेत. औरंगजेबाची कबर काढण्यासाठी कोणत्या प्रकारची तारीख अथवा वेळ घोषित केली जाणार नाही. माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले, ज्या ठिकाणी महाराजांनी लढाई केली त्या ठिकाणी महाराजांचे भव्यदिव्य स्मारक व्हावे, अशी इच्छा होती. सरदेसाई यांनी जागा द्यावी म्हणून प्रयत्न केले. स्मारकाला स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाइज असे नाव द्यावे, अशी मागणी केली. ११ मार्च स्मरण दिन असून, तो दिवस कधीही विसरणार नाही.

सुरुवातीला ५, नंतर ५० एकर – आमदार शेखर निकम यांनी धर्मवीर छत्रपती शंभूराजे कायम स्मरणात राहिले पाहिजेत, असे नमूद करून स्मारक चांगल्या पद्धतीने तयार होईल, अशाप्रकारे प्रयत्न करून सुरुवातीला पाच एकर नंतर पन्नास एकर जमिनीमध्ये इतिहासाची साक्षीदार होईल, असे स्मारक उभारू, तसेच कसबा ते शृंगारपूर हा रस्ता चांगल्याप्रकारे तयार करून इतर पुरातन वास्तूही विकसित करण्यासाठी

RELATED ARTICLES

Most Popular