“आपला बाप (समाज) २० तारखेला येणार आहे आणि तो बाप निर्णय घेणार आहे, असे सांगतानाच वेळ पडली तर मराठे एकेकाचा एन्काऊंटर करतील”, असे बेधडक वक्तव्य मराठा. समाज नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. यावेळी त्यांनी मराठा समाज स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट संकेतही दिले. एकंदरीत त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची झोप उडाली आहे. २० नोव्हें. रोजी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. हाच धागा पकडत जरांगे पाटील म्हणाले की, आपल्याला ९५ टक्के समाजकारण आणि ५ टक्के राजकारण करायचे आहे.
उमेदवारांबद्दल चर्चा झाली आहे. आपला बाप (समाज) २० तारखेला येणार आहे आणि तो बाप निर्णय घेणार आहे, शेती, आरक्षण, दलित, मुस्लिम, गोरगरीब, ओबीसींच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. मी सर्वांची मते जाणून घेतली आहेत. उद्या कोणीही बोलू नये की आम्हाला मते मांडू दिली नाहीत म्हणून !आजपर्यंत १८०० उमेदवारी अर्ज आले आहेत आणि आज पुन्हा काही अर्ज आले’ आहेत, असे मनोज जरांगे पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले.
फडणवीसांचा कार्यक्रम लावणार ! – ही लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम लावणार आहे. आम्हाला या मनःस्थितीमध्ये येण्यास फडणवीस यांनी भाग पाडले. जो समाज त्यांच्या बाजूने होता त्यांचे मुडदे फडणवीस यांनी पाडले. देशातील सर्वात डागी माणूस… न्यायांची अपेक्षा फडणवीस यांच्याकडून होती; पण त्यांनी आमच्या नरड्यात विष, ओतले, असा गंभीर आरोप त्यांनी कलाक करतील, असा घणाघातही जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. भाजपच्या नेत्यांनी जाता-जाता खुन्नस दिली आणि आम्हाला मराठ्यांशी काही देणेघेणे नाही हे दाखवले, असेही ते पुढे म्हणाले.
अनेकांनी घेतली भेट – मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार म्हटल्यावर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या भूमिकेमुळे सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसला होता. आता विधानसभेतही एक पाऊल पुढे टाकत स्वतः मराठा समाजाचे उम `दवार उभे करण्याच्या तयारीत असल्याने सर्वच राजकीय पक्षांची पाचावर धारण बसली आहे. आजी-माजी आमदार अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेत आहेत.
टोपेंनी घेतली भेट – विशेष म्हणजे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मनोज जरांगे यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. मनोज
जरांगे पाटील यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले त्यावेळी १८०० उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे या बैठकीसाठी प्रचंड गाड्यांचा ताफा आला. १० एकराच्या वर जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर
कार्यकर्ते एकवटले होते. हा सर्व माहोल “पाहता सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे लागून राहिले आहे.