25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRajapurशिवकालीन ठेवा संवर्धन करू - आ. किरण सामंत

शिवकालीन ठेवा संवर्धन करू – आ. किरण सामंत

येरडव ते अणुस्कुरा ऐतिहासिक शिवकालीन पायवाट आहे.

तालुक्यातील येरडव ते अणुस्कुरा या सुमारे किमी तीन-चार लांबीच्या शिवकालीन पायवाटेवरील पुरातन पांडवकालीन श्री उगवाई देवीचे मंदिर, मराठी भाषेचा अनमोल ठेवा असलेला आणि शिवकाळातील चौथाई सरदेशमुखीचे अधिकार दिल्याचे निर्देशन करणारा सुमारे दोनशे अडीचशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक शिलालेख, सतत वाहणारा पाण्याचा झरा आदी शिवकालीन ऐतिहासिक ठेवा याचे जतन आणि संवर्धनासाठी राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. येरडव ते अणुस्कुरा या शिवतालीन पायवाटेवरील ऐतिहासिक शिलालेखासह स्थळांचे जतन आणि संवर्धन होताना त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने तत्काळ विकास आराखडा तयार करून प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत त्याचा शासनाला प्रस्ताव सादर करण्याची सूचना आमदार सामंत यांनी लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सचिव यांना केली आहे.

दरम्यान, दैनिक ‘सकाळ’ ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करत ऐतिहासिक ठेवा प्रकाशझोतात आणल्याबद्दल शिवप्रेमींसह तालुकावासीयांकडून दैनिक ‘सकाळ’चे विशेष कौतुक केले जात आहे. तालुक्यातील येरडव ते अणुस्कुरा ऐतिहासिक शिवकालीन पायवाट आहे. या पायवाटेने छत्रपती शिवाजी महाराज कोकणामध्ये आल्याचे सांगितले जात आहे. पाचल-येरडवमार्गे अणुस्कुरा घाटाच्या माथ्यावर जात मुख्य घाटमार्गाला जोडली जाणारी सुमारे तीन-चार कि.मी.च्या या पायवाटेच्या प्रवासासाठी वाहने उपलब्ध नसलेल्या कालखंडामध्ये कोकणातून घाट परिसरामध्ये जा-ये करण्यासाठी शॉर्टकट मार्ग म्हणून उपयोग केला जात असल्याचे सांगितले जात आहे; मात्र, अणुस्कुरा घाटमार्गाचे काम करताना अन्य पायवाटांप्रमाणे येरडव- अणुस्कुरा ही पायवाटही बंद झाली; मात्र, रायपाटण येथील श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी राबवलेल्या स्वच्छता अभियानामध्ये या शिवकालीन पायवाटेवरील ऐतिहासिक ठेवा साऱ्यांसमोर आला आहे.

येरडव-अणुस्कुरा पायवाटेवरील ठेवा – येरडव ते अणुस्कुरा या शिवकालीन पायवाटेवर अणुस्कुराच्या घाटमाथ्यावर असलेले श्री उगवाई देवीचे मंदिर, या मंदिरात असलेली श्री शंकराची पिंडी, ज्या पायवाटेने शिवकाळामध्ये वाहतूक चालायची तो चेकनाका, अवखळपणे वाहणारा पाण्याचा झरा, एक व्यक्ती आत जाईल एवढी रूंद असलेली झऱ्याची येथील गुहा, ऐतिहासिक माहिती देणारी शिलालेख, येरवड येथील प्रसिद्ध श्री दत्तमंदिर.

RELATED ARTICLES

Most Popular