24.9 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriजागृत नागरिक होवू या, अभिमानाने मत देऊ या - जिल्हाधिकारी एम देवेंदर...

जागृत नागरिक होवू या, अभिमानाने मत देऊ या – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

सर्वांनी ब्रँड अम्बेसिडर म्हणून काम करावे आणि मतदार जनजागृती करावी.

विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान वाढविण्यासाठी सर्वांनी ब्रँड अम्बेसिडर म्हणून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले. रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी आज मॅरेथॉन काढण्यात आली. पोलीस मैदान येथून सुरु झालेल्या या रॅलीस जिल्हाधिकारी श्री. सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी ज्येष्ठ नागरिक अविनाश फडके, प्रातांधिकारी जीवन देसाई, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, पोलीस उपअधिक्षक निलेश माईंनकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या ही जास्त आहे. परंतु, मतदान कमी होत असते. त्यामुळे सर्वांनी ब्रँड अम्बेसिडर म्हणून काम करावे आणि मतदार जनजागृती करावी.

समाज माध्यमांवर त्याबाबत स्टेटस लावावेत. आपल्या जिल्ह्याचे जास्तीत जास्त मतदान होईल, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे. मतदानाचे हे पवित्र काम आहे. ते सर्वांकडून व्हावे. तरच लोकशाही आणखी बळकट होईल. सर्वांनी आपल्या भागातील नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करावे. मोठ्या संख्येने सहभागी होऊन निवडणुकीचे पवित्र काम करावे. सुरुवातीला फलकावर स्वाक्षरी करुन स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी शपथ घेतली. या ठिकाणाहून सुरुवात झालेली मॅरेथान जयस्तंभ मार्गे भाट्ये बीच येथे पोहचली. तेथे सांगता करण्यात आली. मॕरेथाॕनमध्ये कोस्टल मॕरेथाॕन फथक, सायकल आसोसिएशन, पोलीस, अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular