26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriरत्नागिरीत वीट कामगाराच्या खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप…

रत्नागिरीत वीट कामगाराच्या खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप…

झटापटीत रूपेशचा मार राजूच्या गुप्तांगावर बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

चिंचघर वेताळवाडी (ता. खेड) येथे चार वर्षांपूर्वी वीटभट्टीच्या व्यवसायातील दोन कामगारांमध्ये हाणामारी झाली. त्या हाणामारीत वर्मी मार बसल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी खेड अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. रूपेश राजबहाद्दर कारकी (२५, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. कळंबणी माळवाडी, खेड) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २१ ते २३ मार्च २०२० या कालावधीत घडली होती. प्रदोष प्रकाश सावंत यांनी याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. सावंत यांचा वीटभट्टी, हॉटेल आणि राजकमल टुरिझमचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे नेपाळी आणि स्थानिक कामगार होते. त्यातील मयत राजू लक्ष्मण मोरे (वय ४२, रा. चिंचघर वेताळवाडी, ता. खेड) हा २० वर्षे त्यांच्या वीटभट्टी व जलतरण तलावाची निगा राखण्याचे काम करत होता. २० मार्च २०२० रोजी आरोपी रूपेश कारकी हा प्रदोष सावंत यांच्याकडे काम मागण्यासाठी आला होता.

प्रदोष सावंत यांनी त्याला २१ मार्चला वीटभट्टी कामगार राजू मोरेसोबत वीटभट्टीवर कामासाठी पाठवून दिले होते. त्या दिवशीच्या रात्री कामगार राजू मोरे हा जेवायला आला नाही, म्हणून मालक प्रदोष सावंत यांनी त्याला फोन केला; परंतु त्याने फोन उचलला; पण तो काही बोलला नाही. यावेळी फोनवर पलीकडे काहीतरी बाचाबाची सुरू असल्याचे त्यांना ऐकू आले होते. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास रूपेश कारकीला फोन करून बोलावून घेतले. तेव्हा त्याच्या अंगावरचे कपडे मातीने माखलेले आणि चेहऱ्यावर ओरखडे दिसून आले. दुसऱ्या दिवशी २२ मार्चला कोरोनामुळे कर्फ्यू लावण्यात आला असल्याने राजूचा शोध घेतला नाही. त्यानंतर २३ मार्चला सर्वजण राजू मोरेचा शोध घेत असताना फिर्यादीच्या राजकमल टुरिझममधील जलतरण तलावाच्या बाजूला राहणाऱ्या साळुंखे यांनी २१ मार्चला रात्री साडेअकराला जलतरण तलावाच्या बाजूला ओरडण्याचा आणि झटापटीचा आवाज ऐकू आल्याचे सांगितले.

फिर्यादींनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना राजूचा मृतदेह पालापाचोळ्यात टाकलेला झाडीत दिसून आला. याप्रकरणी प्रदोष सावंत यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी भादंवि कलमान्वये ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की करत होत्या. येथील सरकारी पक्षातर्फे व्हिडिओ कॉन्स्फरन्सद्वारे हा खटला चालवण्यात आला. याप्रकरणी सरकारी अभियोक्ता अॅड. मेघना नलावडे यांनी १७ साक्षीदार तपासले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्र. श. चांदगुडे यांनी आरोपीला भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व १ हजार रुपये दंड तो न भरल्यास १ आठवडा साधी कैद आणि २०१ अन्वये सक्षम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस कान्स्टेबल चंद्रमणी ठोके यांनी काम पाहिले.

दारू पिताना झटापट – २१ मार्चला रात्री आरोपी रूपेश आणि मयत राजू हे दोघेही घटनास्थळी दारू पिण्यासाठी बसलेले असताना राजू एका महिलेशी फोनवर बोलत होता. तेव्हा रूपेशने त्याचा फोन घेतला. या वादातून त्यांच्या झालेल्या झटापटीत रूपेशचा मार राजूच्या गुप्तांगावर बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी रूपेश कारकी याला अटक केली होती. अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

RELATED ARTICLES

Most Popular