रत्नागिरी- सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी रिफायनरी विरोधकांना धमकी दिली आहे. त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीचा पूर्वइतिहास पाहता रिफायनरीला विरोध करणारे आम्ही जनप्रतिनिधी आणि रिफायनरीला विरोध करणारे स्थानिक ग्रामस्थांचे प्रतिनिधी यांच्या जीवितास धोका आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. रिफायनरीला विरोध करणाऱ्या आम्हा सर्वांच्या जीविताचे रक्षण करावे, असे निवेदन माजी खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी रिफायनरी विरोधकांना जी गंभीर धमकी दिली आहे याबाबत वृत्तपत्रातील प्रसिद्ध झालेल्या बातम्या सोबत त्यांनी जोडल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाला यापूर्वी नाणार येथे सुद्धा प्रचंड विरोध झाला होता तसेच, बारसू येथे देखील प्रस्तावित रिफायनरीत प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच मी आणि स्थानिक आमदार राजन साळवी, शिवसेना पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, व पदाधिकारी यांनीदेखील रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना पाठिंबा दिला.
विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला आहे. सातत्याने रिफायनरी विरोधी आंदोलनामध्ये आम्ही सर्व सहभागी होत असतो काल (ता. ९) ला खासदार नारायण राणे यांनी राजापूर येथे केलेल्या या वक्तव्यानुसार ‘रिफायनरी विरोधकांना परत जाऊ देणार नाही’, अशी गंभीर धमकी दिली आहे. या धमकीची आपण गांभीयनि दखल घ्यावी व त्यांच्यावस् योग्य ती कारवाई करून आम्हा सर्वांच्या जीविताचे रक्षण करावे, असे पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.