25.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriरत्नागिरीत रस्त्यांची अक्षरशः चाळण शिवसेना ठाकरे गटाचे आज आंदोलन

रत्नागिरीत रस्त्यांची अक्षरशः चाळण शिवसेना ठाकरे गटाचे आज आंदोलन

छोट्या वाहनांपासून ते मोठ्या वाहनांचे खड्ड्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. 

रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात शनिवारी ४ ऑक्टोबरला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने दुपारी १२ वा. चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. नागरिकांनी देखील या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांत मोठा गणेशोत्सव शहरातील खड्ड्यांमधुन प्रवास करूनच साजरा झाला. नवरात्रोत्सवही तसाच गेला. खड्ड्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. खड्ड्यांमुळे अगदी दुचाकी ते मोठ्या वाहनांपासून सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. या खड्ड्यांचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी सर्व वाहनधारकांनी ज्यांना वाटते आहे की, शहरातील रस्ते चांगले व्हावे, त्यांनी शनिवारी ४ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता तुम्ही जिथे आहे तिथे ५ मिनिटे थांबुन शहरात चक्काजाम करावा, खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेला जाग आणण्यासाठी स्वयंस्पुर्तीने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी यानिमित्ताने केले आहे.

मी पालकमंत्री ना. उदय सामंत यांना आव्हान देतों की, तुम्ही लोकप्रिय आहात, आम्ही अलोकप्रिय आहोत. तुम्ही विमानातून फिरण्यापेक्षा रत्नागिरीतील रस्त्यातून फिरून दाखवावे आपले कर्तुत्व सर्वांच्या लक्षात येईल, असे आव्हानही त्यांनी दिले. माजी खासदार विनायक राऊत यांच्या अभ्युदयनगर येथील संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, उपशहर प्रमुख प्रसाद सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. रस्त्यांची चाळण माजी आ. बाळ माने म्हणाले की, शहरात खड्ड्यांचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. अंतर्गत रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. छोट्या वाहनांपासून ते मोठ्या वाहनांचे खड्ड्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे.

शहरीभागात रस्ते झाले की किमान दोन वर्षांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला ग्रामीण भागात रस्त्याचे काम केले तर ५ वर्षे देखभाल दुरूस्तीची जबाबदारी त्या ठेकेदाराची आहे. परंतु रत्नागिरीत वेगळेच चित्र आहे. आता काँक्रिटीकरणाचे रस्ते देखील खराब झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या डांबरीकरण आणि काँक्रिटिकरणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आम्ही मुख्याधिकाऱ्यांकडे करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. १० तारखेपर्यंत परतीचा पाऊस संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी जर शहरातील रस्ते गुळगुळीत झाले नाही, तर उबाठा सेना तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा बाळ माने यांनी दिला.

RELATED ARTICLES

Most Popular