24.5 C
Ratnagiri
Thursday, January 30, 2025

वरुण धवनची मालिका रिलीज होताच फ्लॉप झाली…

वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू स्टारर...

U19 महिला T20 विश्वचषकात टीम इंडियाचा सेमीफायनल सामना इंग्लंड विरुद्ध

19 वर्षांखालील महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन...

रामपूर, वावे केंद्रांचे होणार ग्रामीण रुग्णालय – आ. भास्कर जाधव

तालुक्यातील रामपूर व खेड तालुक्यातील वावे येथील...
HomeDapoli'स्थानिक स्वराज्य'च्या निवडणुका एकत्र लढणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम

‘स्थानिक स्वराज्य’च्या निवडणुका एकत्र लढणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम

१०० टक्के युतीचे पालन केले जाईल.

राज्यात महायुतीत नाराजी असल्याचे चर्चा सध्या रंगल्या आहेत. पालकमंत्रिपदावरून धुसफूस सुरू आहे; मात्र या सगळ्या नाराजीच्या चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळल्या आहेत. अशातच शिवसेनेचे युवानेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोली मतदारसंघातील एका कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या युती म्हणूनच एकत्र लढवल्या जातील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. दापोली तालुक्यातील दाभोळ बंदरातील जेटीच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय खांडके, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, किशोर देसाई, उन्मेष राजे, प्रदीप सुर्वे, भगवान घाडगे, सुनील दळवी, आदी उपस्थित होते. योगेश कदम म्हणाले, १०० टक्के युतीचे पालन केले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण एकत्रच लढू.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही युतीचे पालन करून लढवल्या जातील; पण तिथे देखील सगळे तोलूनमापून होणारच आहे. कोणी काम केले आणि कोणी नाही केले, या सगळ्याचा अहवाल आपल्या पक्षामार्फत वरिष्ठांपर्यंत पोहोचलेला आहे. ज्यांनी विधानसभेला महायुतीच्या विरोधात काम केले त्यांचा अहवाल भाजपच्या व महायुतीच्या नेत्यांकडे गेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. मला या ठिकाणी आवर्जून सांगावे लागेल की, या विधानसभा निवडणुकीत माझ्या मतदारसंघात मिळालेले मोठे मताधिक्य व महाराष्ट्रातही महायुतीला मिळालेले मोठे यश या सगळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या निवडणुकीत सगळ्यांनी महत्त्वाची व चांगली भूमिका बजावली आहे.

प्रत्येक सर्कलमध्ये महसूल मेळावा – शिवसेनेचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे व माझाही १८ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. या निमित्ताने आपण महसूल पंधरवडा साजरा करत आहोत. प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक सर्कलमध्ये महसूलचे मेळावे घेऊन सगळ्या प्रकारचे दाखले तुम्हाला तिथेच तत्काळ मिळतील. तहसील कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. असा कृती आराखडा कार्यक्रम आपण तयार करत आहोत. यापुढील काळात तहसील कार्यालय व पंचायत समिती येथे माझा एक स्वीय सहायक तुमच्या सहकार्यासाठी, मदतीसाठी कायम बसलेला असेल, अशी ग्वाही कदम यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular