27.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeLifestyleलकी बांबू रोपटे, एक इनडोअर प्लांट

लकी बांबू रोपटे, एक इनडोअर प्लांट

फेंग शुई किंवा वास्तुशास्त्रानुसार एक लोकप्रिय रोप आहे. हे आपल्या जीवनामध्ये नशीब आणि समृद्धी आणते असे जाणकारांचे मानणे आहे.

एक सामान्य घरगुती रोप म्हणून लकी बांबूची ओळख आहे. फेंग शुई किंवा वास्तुशास्त्रानुसार एक लोकप्रिय रोप आहे. हे आपल्या जीवनामध्ये नशीब आणि समृद्धी आणते असे जाणकारांचे मानणे आहे. लकी बांबू प्लांटचे खरे नाव ड्रॅकेना सँडेरियाना आहे. या प्लांटची काळजी घेणे खुप सोपे आहे आणि मुख्य म्हणजे त्याची वाढ सूर्यप्रकाशा शिवाय होते.

हे एक इनडोअर प्लांट आहे, जे घर आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा पसरवते. रूममध्ये ते उजव्या कोपऱ्यात ठेवले पाहिजे. लकी बांबू प्लांट जेव्हा लाल रिबनने बांधले जाते,  तेव्हा ते अग्नी तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. हे जीवनात संतुलन निर्माण करण्यासाठी देखील ओळखले जाते. हे प्लांट पृथ्वी, पाणी, धातू, अग्नि आणि लाकूड या विशेष तत्त्वांचे प्रतिनिधित्व करते. चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी ते पूर्व दिशेला ठेवणे लाभदायक असते. धन संपत्तीसाठी ते दक्षिण-पूर्व म्हणजे नैऋत्य दिशेला ठेवा.

जर या प्लांटची योग्य काळजी घेतली तर हे सुमारे दहा वर्षेहून अधिक देखील जगू शकते. चीनी संस्कृतीतील लकी बांबू प्लांटचा इतिहास सुमारे चार हजार वर्षांचा आहे. आशियाई संस्कृतीत या प्लांटचा उपयोग नशीबाचे प्रतीक म्हणून केला जातो आणि नवीन वर्षाच्या उत्सवात आणि कोणत्याही धार्मिक उत्सवा दरम्यान ही एक परिपूर्ण भेट असू शकते. यामध्ये विविध प्रकारचे थर दिलेले असून, त्याची वैशिष्ट्ये देखील विविध आहेत.

दोन थरः हे ड्रॅकेना सँडेरियाना प्रजातीचे असल्याने मुख्य करून, खडे आणि पाण्याने भरलेल्या काचेच्या फुलदाण्यामध्ये वाढवले जातात. पण तुम्ही माती असलेल्या कुंडीत देखील रोपे लावू शकता.

तीन थरः शास्त्रोक्त पद्धतीने या प्लांटला फ्रेंडशिप बांबू, कर्ली बांबू, चायनीज बांबू, चायनीज वॉटर बांबू इत्यादी नावे देण्यात आली आहेत. हे भारत, चीन आणि तैवानमध्ये दिसणारे एक आदर्श इनडोअर प्लांट असून त्याची विशेष देखभाल करावी लागत नाही शिवाय ते अगदी कमी प्रकाशातही चांगले वाढते.

सात थरः हे प्लांट ज्या वातावरणात ते ठेवले जाते तेथे ते भाग्य आणि शांतता आणते. परंतु, ते निरोगी राहण्यासाठी याला फक्त फिल्टर केलेले पाणी देणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular