26.7 C
Ratnagiri
Saturday, August 9, 2025

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणवासियांना सुविधा केंद्र – सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

गणेशउत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांसाठी सुविधा केंद्र देण्यात...

समुद्र शांत झाल्याने मच्छीमार आनंदात…

वातावरणाने साथ न दिल्यामुळे मासेमारी बंदी उठूनही...

मुंबई – गोवा महामार्गावरील चाकरमान्यांचा प्रवास अंधारातूनच

चौपदरीकरण झालेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पथदिव्यांची सोय...
HomeSindhudurgसिंधुदुर्गात पुन्हा 'लम्पी'चा प्रकोप...

सिंधुदुर्गात पुन्हा ‘लम्पी’चा प्रकोप…

जनावरांच्या अंगावर बसणाऱ्या माश्यांमुळे दुसऱ्या जनावरांना झपाट्याने त्याची लागण होते.

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पशुपालकांचे कंबरडे मोडलेल्या ‘लम्पी स्क्रीन’ने यावर्षी पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६०० जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव झाला असून, ८ जनावरे दगावली आहेत. ‘लम्पी’चा विळखा अधिक घट्ट होत असल्यामुळे पशुपालकांची झोप उडाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘लम्पी स्क्रीन’ने २०२३ मध्ये सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. जिल्ह्यात ६ हजारांपेक्षा अधिक जनावरांना ‘लम्पी’ची लागण झाली होती, तर २०० हून अधिक जनावरे दगावली होती. जिल्ह्यातील पशुपालकांना मोठा फटका बसला होता. आता लम्पीने पुन्हा डोके वर काढल्याने पशुपालकांना धडकी भरली आहे. जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच लम्पीचा प्रादुर्भाव कुडाळ, सावंतवाडी या तालुक्यांतील काही गावांमध्ये सुरू झाला. पशुसंर्वधन विभागाने त्याबाबत गुप्तता पाळली होती. मात्र, जुलैमध्ये ‘लम्पी’चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला.

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर ‘लम्पी’ने डोके वर काढल्याने शेतकरी हैराण झाले. जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळसह मालवण, कणकवली, देवगड, वेंगुर्ले, वैभववाडी या तालुक्यांमध्येदेखील प्रादुर्भाव वाढू लागला. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात केवळ २९८ जनावरांना प्रादुर्भाव झाला होता, तर दोन जनावरे दगावली होती. मात्र, या पंधरा दिवसांत लम्पी’चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढून ही संख्या आता ६०० वर पोहोचली आहे. आतापर्यंत ८ जनावरे दगावली आहेत. ४१८ जनावरांवर यशस्वी उपचार झाले आहेत, तर जिल्ह्यात १७४ जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत. ‘लम्पी’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पशुपालकांची भीती वाढली आहे. एकीकडे ‘लम्पी’चा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे पशुसंवर्धनमधील रिक्त पदांमुळे काही मोजक्या अधिकाऱ्यांवर ‘लम्पी’ थोपविण्याची जबाबदारी आली आहे. दैनंदिन कामासोबत अतिरिक्त कामाचा ताण या कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने ते अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. पशुसंवर्धन विभागाने ‘लम्पी स्क्रीन’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांना युद्धपातळीवर लसीकरण सुरू केले आहे. जिल्ह्यातील ६० टक्के जनावरांना लसीकरण केले आहे.

माशीमुळे प्रादुर्भाव – पशुसंवर्धन विभागाच्या मते, ‘लम्पी’ संसर्गजन्य आजार आहे. जनावरांच्या अंगावर बसणाऱ्या माश्यांमुळे दुसऱ्या जनावरांना झपाट्याने त्याची लागण होते. बाधित जनावरांच्या अंगावर बसलेली माशी दुसऱ्या जनावरांच्या अंगावर बसली तरी हा प्रादुर्भाव होतोच. मात्र, जरी ती माशी चाऱ्यावर बसली आणि त्या चाऱ्याचा जनावरांशी संपर्क आला, तरीदेखील त्या जनावरांना लागण होते.

RELATED ARTICLES

Most Popular