भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल या दोन नेत्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्द्ल वादग्रस्त वक्तव्य केल्याने जगभरातून भारताविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक फोटोचा देखील निषेध करण्यात आला. अशातच आता या वक्तव्यामुळे आखाती देशांमध्ये भारतीय उत्पादनावर बंदी घालण्यात येत आहे.
अलकायदाने देखील इशारा दिला आहे की, काही दिवसांपूर्वी एका हिंदुत्व प्रचारकाने टीबीच्या चर्चेदरम्यान इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अलकायदाने पुढे म्हटलं, ‘आम्ही पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेऊ. आम्ही इतरांना या लढ्यात सहभागी होण्यास सांगू. पैगंबर मोहम्मद यांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही मारून टाकू. आम्ही आमच्या शरीराला आणि आमच्या मुलांच्या शरीराला स्फोटके जोडू, जेणेकरून अशा लोकांना उडवता येईल.
पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा जोर धरत आहे. या प्रकरणात नुपूर शर्मांनीही आपल्याला धमक्या मिळाल्याचा आरोप केला आहे, या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना ६ वर्षासाठी निलंबित केले, तर नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी केली आहे. आखाती देशांमध्ये कतार, इराण, इराक, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, कुवेत, इंडोनेशिया, जॉर्डन, ओमान, लिबिया, मालदीव, बहरीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांकडून भारताविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी बाजारातून भारतीय उत्पादनावर बंदी आणली जात आहे. कुवेत शहरातील एका सुपरमार्केटमध्ये भारतीय उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांची तांदळाची पोती, मसाले आणि मिरचीचे शेल्फ सुपरमार्केट मध्ये प्लास्टिकने झाकून ठेवण्यात आली आहेत. यावर फलकही लावण्यात आला आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणी अधिक प्रमाणात वाढल्या आहेत.

