26 C
Ratnagiri
Saturday, November 22, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriमशीन बिघडले आणि रेशनचे वितरण रखडले सणासुदीच्या दिवसांत गोरगरीबांसमोर अडचणी

मशीन बिघडले आणि रेशनचे वितरण रखडले सणासुदीच्या दिवसांत गोरगरीबांसमोर अडचणी

धान्य वाटप सुरू असताना ई-पॉस मशीनमध्ये समस्या निर्माण होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांना जून आणि जुलै महिन्याचे धान्य वाटप झाले असून ऑगस्ट महिन्याचे व चालू महिन्याचे वाटप सुरू आहे. मात्र आता जिल्ह्यातील रेशन दुकानातील धान्य देताना ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण होत आहेत. नावे टाईप करताना अडचण, नेटवर्क यासह विविध समस्यांमुळे ऑगस्टसह चालू महिन्याचे धान्य लाभार्थ्यांना मिळाले नसल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ही अडचण केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित नसून राज्यातील सर्वच ठिकाणी ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाले असून ती समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात अंत्योदय, प्राधान्य कुटुंबे मिळून जिल्ह्यात ११ लाख ३१ हजार २५६ इतके लाभार्थी आहेत. ऑगस्ट आणि चालू महिन्यातील धान्य वाटप सुरू असताना ई-पॉस मशीनमध्ये समस्या निर्माण होत आहे.

सध्या इंग्रजीत नावे मशिनमध्ये सेव्ह असणाऱ्यांना धान्य मिळत आहे. मात्र मराठीत नावे असलेल्यांना धान्य मिळत नाही. या तांत्रिक समस्यांबरोबरच नेटवर्क, ई-केवायसी यासह विविध कारणांमुळे धान्य वाटप करताना समस्या येत आहे. जिल्ह्यातील कित्येक लोकांची गुजराण रेशनच्या धान्यवर होत असते. त्यामुळे दर महिन्याला धान्य मिळणारे आवश्यकच असते. अशा वेळी जेव्हा रेशन वितरण सुरू होते. त्यावेळी रेशन दुकानावर मोठी गर्दी होते. मात्र जेव्हा रेशन कार्डधारक रेशन घ्यायला जातात तेव्हा, इंग्रजी नाव येणाऱ्या कुटुंबांना रेशन मिळते. मात्र मराठीत नाव असल्यास टाईप होते, पण नाव न दाखवणे यासह विविध समस्या येत आहेत.

ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक समस्या असल्यामुळे धान्य वाटप करताना अडचण निर्माण होत आहे. जून, जुलै महिन्याचे शंभर टक्के धान्य वाटप झाले आहे. तर ऑगस्ट महिन्याचे काही आणि चालु महिन्याचे धान्य वाटप करण्यात येणार आहे. ई-पॉस मशीनची समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात काम सुरू आहे. लवकरच समस्या सुटेल आणि धान्य वाटप सुरळीत होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular