27 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeEntertainmentमहामिनिस्टर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण, ११ लाखांची सोन्याची जर आणि हिरे असलेली पैठणी

महामिनिस्टर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण, ११ लाखांची सोन्याची जर आणि हिरे असलेली पैठणी

या ११ लाखांच्या पैठणीच विशेष वैशिष्ट्य असं आहे की,  ही पैठणी दिव्यांग कारागिरांच्या कलाकृतीतून बनली आहे.

झी मराठीवरील मागील १४ वर्षापासून सुरु असलेला होममिनिस्टर या सदाबहार कार्यक्रमाच्या नवीन पर्वाची घोषणा करण्यात आली आहे आणि प्रेक्षकांमध्ये एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे. महामिनिस्टर या नवीन पर्वातील विजेत्या वहिनीला चक्क हिऱ्या आणि सोन्याने मढवलेली ११ लाखांची पैठणी भेट म्हणून मिळणार आहे. या ११ लाखांच्या पैठणीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

इतके वर्ष हा कार्यक्रमाची उत्कंठा वाढवून यशस्वीपणे राबविणाऱ्या आदेश बांदेकर भाऊजीसुद्धा ही पैठणी बघण्यासाठी उत्सुकता लागली आहे. या पैठणी बद्दल बोलताना आदेश भाऊजी म्हणाले, “ही ११ लाखांची पैठणी कशी असेल ही पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांप्रमाणेच मला देखील आहे. महामिनिस्टरमध्ये विजेत्या वहिनीला जी ११ लाखांची पैठणी देण्यात येणार आहे ती पैठणी नाशिक जिल्ह्यातील येवला येथून खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने येवल्याच्या पैठणी उद्योग व्यवसायाची प्रसिद्धी होऊन व्यवसाय वृद्धीसाठी बळ मिळेल. आणि मुख्य म्हणजे या ११ लाखांच्या पैठणीच विशेष वैशिष्ट्य असं आहे की,  ही पैठणी दिव्यांग कारागिरांच्या कलाकृतीतून बनली आहे.

बांदेकरांनी या पैठणीचे वैशिष्ट्य देखील सांगितले आहे. ते सांगतात,  महाराष्ट्राचे महावस्त्र असलेल्या या पैठणीवर जरी सोन्याची जर आणि हिरे असले तरी ते नक्षीकाम करणारे कारागीर पण अतिशय खास आणि प्रतिभावान आहेत यापेक्षा कौतुकाची बाब काय ठरणार आहे! नवी कोरी लाख मोलाची पैठणी, महाराष्ट्रांच्या वहिनींसाठी ११ लाखांची सोन्याची जरी आणि हिरे असलेली पैठणी नक्कीच आकर्षण ठरणार आहे. ११ लाखांच्या पैठणीवर वहिनींनी धमाकेदार उखाणे देखील घेतले आहेत.

महामिनिस्टर या कार्यक्रमाचा श्रीगणेशा नाशिक शहरापासून झाला असून, ११ एप्रिल पासून हा कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नाशिकमधून या महामिनिस्टरला जोरदार प्रतिसाद मिळाला असून, उपस्थित असलेल्या अनेक महिलांमधून १०० वहिनींची निवड महामिनिस्टर कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular