महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उरले नाही तर ‘काय दे’चे राज्य सुरु असल्याचा घणाघात आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबईमध्ये भाजप कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. अमरावती, नांदेड आणि मालेगावातील हिंसाचार, राज्यातील सामुहिक बलात्काराच्या वाढत्या घटना, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, वसुली आणि भ्रष्टाचाराचे आरोप या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नाही तर भ्रष्टाचाराचे राज्य असल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत टीका केली आहे. “कायतरी द्या वाल्यांचे राज्य गेल्यामुळे” त्यांची वेदना मी समजू शकतो असा खोचक पलटवार राऊत यांनी फडणवीसांवर केला आहे.
तसेच उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री वाटत नाहीत या वक्तव्यावरही राऊतांनी फडणवीसांना चपराक लगावली आहे. संजय राऊत म्हणाले की, या राज्यातील करोडो जनतेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून ते आपल्यातीलच एक आहेत, त्यामुळे आपण स्वतःच मुख्यमंत्री असल्याचे वाटत आहे. ही लोकशाहीमध्ये नक्कीच वाखाणण्याजोगी मोठी गोष्ट आहे. असे संजय राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले कि, या राज्याचा प्रत्येक नागरिक मुख्यमंत्री आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून लोकांना वाटत आहे ही सत्ता माजी आहे हे राज्य माझे आहे. यामुळे फडणवीसांनी मान्य केलं आहे.
भाजप आणि सेनेमधील धुसपूस आता चव्हाट्यावर आलेली दिसून येत आहे. विरोधी पक्षांच्या चाललेल्या कुरघोडी थांबत नसल्याने शिवसेना सुद्धा त्यांना वेळीच प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे एक प्रकारचे कथित द्वंद्व युद्ध सुरु असल्याचे नजरेस पडत आहे.